विद्या समीक्षा केंद्रांतर्गत स्मार्ट उपस्थिती या Bot वर विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थित्ती नोंदविणेबाबत student online attandance nondavne 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विद्या समीक्षा केंद्रांतर्गत स्मार्ट उपस्थिती या Bot वर विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थित्ती नोंदविणेबाबत student online attandance nondavne 

संदर्भ : १) राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांचे पत्र जा.क्र. मप्राशिप /सशि/संगणक / VSK/२०२२-२३/२९८४, दि.०३ नोव्हेंबर २०२३

२) शासन निर्णय क्र. समग्र २०२४/प्र.क्र. ३३ / एसडी-१ मादाम कामा मार्ग, हुतात्मा चौक, मंत्रालय विस्तार, मुंबई, ४०००३२. दिनांकः १२ मार्च, २०२४.

उपरोक्त विषयान्वये, शिक्षण क्षेत्रातील माहिती संकलन व विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवान व सुलभ व्हावी. तसेच धोरणकर्ते, शिक्षक आणि सर्व स्तरावरील प्रशासकांसह विविध भागधारकांना डेटा विश्लेषणासाठी एकत्रित व्यासपीठ प्रदान करावे व त्याआधारे राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर गरजा लक्षात घेऊन उपक्रम / योजना आखण्यास मदत व्हावी, याकरिता संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या नियंत्रणाखाली विद्या समीक्षा केंद्र (VSK) कार्यान्वित करण्यात आले आहे.

संदर्भ क्र. १ अन्वये, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील इ. १ ली ते इ. १० वीच्या इयत्तेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती Swift Chat या Application मधील स्मार्ट उपस्थिती या Bot द्वारे ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्याची प्रक्रिया दि. ०१ डिसेंबर २०२३ पासून सुरु करण्यात आलेली होती. परंतु जिल्हा स्तरावरील क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत याबाबत नियमित आढावा घेणे, तसेच सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे विद्यार्थी

उपस्थिती ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्यामध्ये अनियमितता दिसून आली आहे. संदर्भ क्र. २ च्या शासन निर्णयानुसार, सर्व विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थित्ती नोंदविण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. तरी आपल्या अधिनस्त सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना स्मार्ट उपस्थिती या Bot वर

विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविण्यासाठी आदेशित करावे. तसेच सदर उपस्थिती नियमितपणे नोंदविली जात असल्याबाबत आपल्या स्तरावरून आढावा घेण्यात यावा.

सोबत : मार्गदर्शक

सूचना

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top