विद्या समीक्षा केंद्रांतर्गत स्मार्ट उपस्थिती या Bot वर विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थित्ती नोंदविणेबाबत Student  attandance on smart bot 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विद्या समीक्षा केंद्रांतर्गत स्मार्ट उपस्थिती या Bot वर विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थित्ती नोंदविणेबाबत Student  attandance on smart bot 

संदर्भ : १) या कार्यालयाचे पत्र जा.क्र. मप्राशिप / सशि/संगणक /VSK/२०२२-२३/२९८४, दि.०३-११-२३

२) शासन निर्णय क्र, समग्र २०२४/प्र.क्र. ३३/ एसडी-१ मादाम कामा मार्ग, हुतात्मा चौक, मंत्रालय विस्तार, मुंबई, ४०००३२. दिनांक: १२ मार्च, २०२४.

३) संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे पत्र जा. क्र. राशैसंप्रयम/आय टी/VSK/आदेश/२०२४-२५/०३१९९ दि.४-७-२४.

४) Director (Digital Education), केंद्रीय शिक्षा मंत्रालय, भारत सरकार यांचे पत्र क्र. १-३४/ २०२२-(DIEGD-part (३) दि.२६-९-२०२४.

उपरोक्त विषयान्वये, शिक्षण क्षेत्रातील माहिती संकलन व विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगदान व

सुलभ व्हावी. तसेच धोरणकर्ते, शिक्षक आणि सर्व स्तरावरील प्रशासकांसह विविध भागधारकांना डेटा

विश्लेषणासाठी एकत्रित व्यासपीठ प्रदान करावे व त्याआधारे राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर गरजा लक्षात घेऊन उपक्रम / योजना आखण्यास मदत व्हावी, याकरिता विद्या समीक्षा केंद्र (VSK) कार्यान्वित करण्यात आले आहे.

संदर्भ क्र. १ ते ३ अन्वये, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील इ. १. ली ते इ. १० वीच्या इयत्तेतील विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती विद्या समीक्षा केंद्राच्या Swift Chat या Application मधील स्मार्ट उपस्थिती या Bot द्वारे ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्याची प्रक्रिया दि. ०१ डिसेंबर २०२३ पासून सुरु करण्यात आली आहे. तथापि, याबाबत सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून नियमित आढावा न घेतल्याने शिक्षक मुख्याध्यापक यांचेद्वारा याची नियमित अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

तरी आपल्या अधिनस्त सर्व क्षेत्रीय अधिकारी यांचेद्वारा नियमित आढावा घेऊन आपल्या क्षेत्रातील सर्व शाळांमध्ये १०० % विद्यार्थी उपस्थिती नियमित नोंदविली जाईल याची खात्री करावी,

विद्यार्थी स्मार्ट बॉट attendance शासन परिपत्रक