राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये “राज्यगीत” वाजविले/गायले जाणेबाबत statesong in all state school 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये “राज्यगीत” वाजविले/गायले जाणेबाबत statesong in all state school 

संदर्भः-सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-१४२३/प्र.क्र.१२/कार्या-३१ (राजशिष्टाचार), दिनांक ०१ फेब्रुवारी, २०२३

प्रस्तावना:-

“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” चे औचित्य साधून राज्यातील तरुणाई तसेच समाजातील सर्वच नागरीकांना स्फुर्तीदायक असणारे तसेच महाराष्ट्राच्या शौर्याचे वर्णन करणारे अस्मितादर्शक श्री. राजा निळकंठ बढे लिखित व शाहिर साबळे यांनी गायलेले “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत राज्यगीत म्हणून वरील संदर्भीय शासन निर्णयान्वये स्विकृत करण्यात आलेले आहे. सदर राज्यगीत हे अत्यंत आशयपूर्ण, स्फुर्तीदायक आणि राज्याच्या थोर आणि शूर परंपरांची गाथा सांगणारे आहे. सदर राज्यगीत राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये दैनिक सत्र सुरू होण्यापुर्वी, राष्ट्रगीत/परिपाठ/प्रार्थना / प्रतिज्ञा यासोबत वाजविले/गायले जाईल यानुषंगाने सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन परिपत्रकः-

सामान्य प्रशासन विभागाच्या वरील संदर्भीय शासन निर्णयान्वये राज्यगीत गायन/वादन या संदर्भातील औचित्याचे पालन करण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. सदर सूचनांमधील सूचना क्रमांक ४ मध्ये राज्यातील शाळांमध्ये दैनिक सत्र सुरू होण्यापुर्वी, राष्ट्रगीत/परिपाठ/प्रार्थना / प्रतिज्ञा यासोबत राज्यगीत वाजविले/गायले जाईल, अशी सूचना करण्यात आलेली आहे. यास अनुसरून वरील संदर्भीय शासन निर्णयान्वये स्विकृत केलेले राज्यगीत राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये दैनिक सत्र सुरू होण्यापूर्वी, राष्ट्रगीत/परिपाठ/प्रार्थना/प्रतिज्ञा यासोबत वाजविले/गायले जाईल, यानुषंगाने खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेतः-

१. सामान्य प्रशासन विभागाच्या वरील संदर्भीय दिनांक ०१ फेब्रुवारी, २०२३ च्या शासन निर्णयान्वये स्विकृत केलेले राज्यगीत राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये दैनिक सत्र सुरू होण्यापुर्वी, राष्ट्रगीत/परिपाठ/प्रार्थना/प्रतिज्ञा यासोबत वाजविले/गायले जाईल.

२. राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये दैनिक सत्र सुरू होण्यापुर्वी, राष्ट्रगीत/परिपाठ/प्रार्थना/प्रतिज्ञा यासोबत राज्यगीत वाजविले/गायले जाईल याची दक्षता शाळा व्यवस्थापनाने घ्यावी.

३. वरील सुचनांचे पालन राज्यातील सर्व शाळा व्यवस्थापन करतील याबाबतची दक्षता सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी घ्यावी.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संकेतांक २०२४०३१५२१२१३५५२२१ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

Join Now