राज्य वेतन त्रुटी निवारण समिती २०२४ कडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाबाबत state vetan aayog truti nivaran samiti 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्य वेतन त्रुटी निवारण समिती २०२४ कडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाबाबत state vetan aayog truti nivaran samiti 

राज्य वेतन त्रुटी निवारण समिती २०२४ कडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाबाबत

प्रस्तावाच्या अनुषंगाने बैठकीस उपस्थित राहण्याबाबत

संदर्भ:- वित्त विभागाचे दिनांक १४.०६.२०२४ रोजीचे पत्र (प्रत सलग्न)

महोदय,

उक्त संदर्भाधीन पत्रान्वये राज्य वेतन त्रुटी निवारण समिती २०२४ कडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने अध्यक्ष, वेतन त्रुटी निवारण समिती यांच्यासोबत विभाग प्रमुख व अधिकारी/कर्मचारी संघटना यांच्या बैठकीबाबतचे सुधारीत वेळापत्रक देण्यात आले आहे. सदर पत्रात शालेय शिक्षण विभागाकरिता दिनांक ०५.०८.२०२४ रोजी सकाळी ११.०० ते १.०० अशी वेळ देण्यात आली आहे.

२. उपरोक्त बैठकीच्या वेळी आपल्या प्रस्तावांच्या अनुषंगाने आपले म्हणणे समितीसमोर मांडण्यासाठी आपल्या स्तरावर योग्य त्या माहितीसह दिनांक ०५.०८.२०२४ रोजी सकाळी ११.०० ते १.०० वाजता मंत्रालय, विस्तार इमारत, २ रा मजला, दालन क्र. २४१, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई-४०० ०३२ येथे (तसेच सादरीकरण करावयाचे असल्यास आगाऊ कळविण्यात यावे.) बैठकीस जास्तीत जास्त २ प्रतिनिधींनी उपस्थित रहावे, ही विनंती. बैठकीदरम्यान मोबाईल फोन वापरण्यास मनाई आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

Leave a Comment