राज्यातील अल्पसंख्याक दर्जा प्राप्त धार्मिक/भाषिक शैक्षणिक संस्था/शाळांची तपासणी करुन अहवाल सादर करणेबाबत state ulpasankhyank school report 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यातील अल्पसंख्याक दर्जा प्राप्त धार्मिक/भाषिक शैक्षणिक संस्था/शाळांची तपासणी करुन अहवाल सादर करणेबाबत state ulpasankhyank school report 

राज्यातील अल्पसंख्याक दर्जा प्राप्त धार्मिक/भाषिक शैक्षणिक संस्था/शाळांची तपासणी करुन अहवाल सादर करणेबाबत

संदर्भ:

१. मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित समन्वय समितीची बैठक दि. ३०/०४/२०२४ चे इतिवृत्त.

२. शासन निर्णय, अल्पसंख्याक विकास विभाग, अशैर्स-२०१२/प्र.क्र.२१/कार्या-५, दि. २७/०५/२०१३.

३. शासन शुध्दीपत्रक, अल्पसंख्याक विकास विभाग, अशैसं-२०१२/प्र.क्र.२१/कार्या-५, दि. ०३/१०/२०१३.

४. अल्पसंख्याक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडून व्हॉट्सअॅपद्वारे प्राप्त यादी दि. ०५/०७/२०२४.

५. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. शिसंयो/योजना-३/अल्पसंख्याक /२०२४-२५/०१६६१ दि.२६/०७/२०२४

६. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. शिसंयो/योजना-३/२०२४-२५/०१५८४ दि.९/०७/२०२४. ७. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. शिसंयो/योजना-३/२०२४-२५/०१७६९ दि.१४/०८/२०२४

८. या. कार्यालयानी अल्पसंख्याक विभागाची प्राप्त यादी टंकलिखित यादीची सॉप्ट कॉपी व एन. आय. सी. कार्यालयाकडून प्राप्त यादी.

९. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. शिसंयो/योजना-३/२०२४-२५/०१८५७ दि.२७/०८/२०२४ १०. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. शिसंयो/योजना-३/२०२४-२५/०२००० दि.२०/०९/२०२४

उपरोक्त संदभर्भीय विषयान्वये, संदर्भीय शासन निर्णय क्र. २ व ३ अन्वये, राज्यातील अल्पसंख्याकांकडून चालविण्यात येणाऱ्या शैक्षणिक संस्थांना धार्मिक भाषिक अल्पसंख्याक दर्जा देण्यासाठी अटी व शर्ती तसेच ऑनलाईन अर्जाबाचतची कार्यपध्दती विहित करण्यात आलेली आहे. संदर्भ क्र. १ अन्वये, मा. आयुक्त (शिक्षण) यांनी समन्वय समितीच्या बैठकीमध्ये राज्यातील आल्पसंख्याक दर्जा प्राप्त धार्मिक / भाषिक शैक्षणिक संस्था/ शाळांची तपासणी करुन अहवाल सादर करणेबाबत आदेशित करण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने संदर्भ क्र. ४ अन्वये, महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील सुरु असलेल्या अल्पसंख्याक दर्जा प्राप्त धार्मिक / भाषिक शैक्षणिक संस्था शाळांची माहिती अल्पसंख्याक विकास विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडून

12

प्राप्त करुन घेण्यात आलेली असून सदर यादी या कार्यालय स्तरावर टंकलेखित करुन घेण्यात आलेली आहे. संदर्भीय पत्र क्र. ५ अन्वये सदर यादी सॉप्ट कॉपी मध्ये आपणास यापूर्वी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

आपल्या जिल्ह्यातील अल्पसंख्याक दर्जा प्राप्त धार्मिक भाषिक शैक्षणिक संस्था / शाळांची तपासणी करुन तपासणी अहवालाचे काम पूर्णत्वास आलेले असेलच. त्या अनुषंगाने कळविण्यात येते की अहवालातील तपासणी प्रपत्रावरुन सोबत जोडलेल्या विहित प्रपत्रात संस्थानिहाय / शाळानिहाय माहिती सॉफ्ट कॉपी तसेच पी.डी.एफ स्वरुपात या संचालनालयाच्या directorscheme.mh@gmail.com या ई-मेल वर पाठविण्यात यावी अशा सूचना देण्यात आलेल्या होत्या. परंतु अद्यापपर्यंत सदरील अहवाल पी.डी.एफ/ सॉफ्ट कॉपी स्वरुपात अहवाल अप्राप्त आहे.

याद्वारे कळविण्यात येते की, जिल्ह्यातील अल्पसंख्याक दर्जा प्राप्त धार्मिक भाषिक शैक्षणिक संस्था / शाळांची तपासणी करुन तपासणी करुन शाळा निहाय / संस्था निहाय विहित प्रपत्रात माहितीची सॉफ्ट कॉपी /पी.डी.एफ स्वरुपात उपरोक्त नमूद ई-मेल वर पाठविण्यात यावी.