दिनांक २४-२५.०१.२०२५ च्या मध्यरात्री पासुन होणारी एस.टी भाडेवाडीची माहिती प्रसारित करणे बाबत state travelling bhadevadha 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दिनांक २४-२५.०१.२०२५ च्या मध्यरात्री पासुन होणारी एस.टी भाडेवाडीची माहिती प्रसारित करणे बाबत state travelling bhadevadha 

संदर्भ :

– मा. महाव्यवस्थापक (वाहतुक) रा प मध्यवर्ती कार्यालय मुंबई यांचे पत्र क्रमांक ४२५ दिनांक २४.०१.२०२५.

उपरोक्त विषयी आपणास कळविण्यात येते की, संदर्भिय पत्रानुसार मा. महाव्यवस्थापक (वाहतुक) रा प मध्यवर्ती कार्यालय मुंबई यांनी दिनांक २४-२५.०१.२०२५ च्या मध्यरात्री पासुन सेवाप्रकारनिहाय भाडेवाढीस मंजुरी दिली आहे त्या अनुषंगाने लातुर येथुन जाणा-या महत्वाच्या शहाराची भाडेवाढ या पत्रासोबत जोडुन आपणाकडे माहिती प्रसारित करण्यातसाठी पाठविण्यात येत आहे.

तरी सदरची माहिती प्रसारित करावी ही नंम्र विनंती. आपले माहिती सादर रवाना.

रा.प. महामंडळाकडुन दि. २५.१.२०२५ पासुन करण्यात येणाऱ्या प्रवास दर वाढीबाबत.

मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या तरतूदीनुसार, शासनास प्रवास भाडे दर ठरविण्याचे अधिकार आहेत. शासनाने आपोआप भाडेवाढ सुत्र मान्य केले आहे. महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या आपोआप भाडेवाढ सुत्रानुसार डिझेल, चेसेस, टायर संच व महागाई भत्त्याच्या मुल्यात बदल झाल्याने सुधारीत प्रवास दर लागू करण्यास संचालक मंडळाने मंजूरी दिली आहे. त्यास राज्य परिवहन प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या दिनांक २३.१.२०२५ रोजी २७६ व्या बैठकीत पारित झालेल्या ठराव क्र. ०२/२०२५ नुसार सुधारीत भाडेदर आकारणी करण्यासाठी रा.प. महामंडळास मंजूरी प्राप्त झाली आहे.

या अनुषंगाने सुधारीत प्रवास भाडेदर दिनांक २५ जानेवारी २०२५ म्हणजेच दिनांक २४ जानेवारी २०२५ व दिनांक २५ जानेवारी २०२५ च्या मध्यरात्री पासुन रा.प. महामंडळाच्या सर्व सेवांना सुमारे १४.९५ टक्के भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.

सुधारीत भाडेवाढीनुसार रा.प. महामंडळाच्या बस प्रकार निहाय प्रथम टप्प्याकरीता (६ किमी) १

रुपये पटीत लागू होणारे दर खालील प्रमाणे.

सुधारीत प्रवासी भाडे दरानुसार रा.प. महामंडळाच्या आवडेल तेथे प्रवास योजना, विशेष बस सेवा योजनेच्या दरात देखील वाढ होणार आहे.

दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी प्रवास सुरु करणाऱ्या ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले असेल अशा प्रवाशांकडुन आरक्षण तिकीटाचा जुना तिकीट दर व नवीन तिकिट दर यातील फरक वाहक कडुन वसुल करण्यात येईल.

CS CamScanner

दिनांक २५ जानेवारी २०२५ च्या ००.०० वाजेपासुन प्रवास सुरु करणाऱ्या प्रवाशांकडुन सुधारम दराने प्रवास भाडे आकारणी करण्यात येणार आहे. तथापि ज्या प्रवाशांचा प्रवास दिनांक २४ जानेवारी २०२५ रोजी सुरु होऊन तो दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी किंवा तदनंतर संपत आहे. अशा प्रवाशांकडुन जुने व सुधारीत प्रवास भाडे यातील फरकाची रक्कम वसुल करण्यात येणार नाही.

वरील प्रमाणे रा.प. महामंडळाकडुन करण्यात येणाऱ्या प्रवास भाडे दरातील वाढीबाबत जनतेस माहीती मिळावी या करीता कृपया आपणामार्फत प्रसिध्दी देण्यात यावी. ही विनंती.