राज्य वेतन त्रुटी निवारण समिती २०२४ – प्रस्ताव सादर करणेबाबत state payment committee 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्य वेतन त्रुटी निवारण समिती २०२४ – प्रस्ताव सादर करणेबाबत state payment committee 

संदर्भ:-१) वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक वेपूर-११२३/प्र.क्र.१७/ सेवा-९, दिनांक १६.०३.२०२४.

२) या विभागाचे समक्रमांक दिनांक ०८.०४.२०२४ व दिनांक ०९.०५.२०२४ रोजीचे पत्र.

महोदय,

संदर्भाधीन क्रमांक १ येथील शासन निर्णयान्वये सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीतील त्रुटींचे निवारण करण्याकरीता वेतन त्रुटी निवारण समिती २०२४ ची स्थापना करण्यात आली आहे. प्रस्तुत शासन निर्णयातील तरतुदीनुसार वेतन त्रुटी निवारण समितीला नियुक्तीच्या दिनांकापासून ६ महिन्याच्या कालावधीत अहवाल शासनाला सादर करावयाचा आहे. यास्तव मंत्रालयीन विभागाच्या अधिनस्त असलेल्या शासकीय कार्यालयातील शासनाकडे प्राप्त झालेल्या सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी बाबतचे अहवाल प्रस्तुत शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक ३ व ४ येथील नमूद तदतुदीप्रमाणे कार्यवाही करुन प्रस्ताव २ महिन्याच्या आत (दिनांक १६ मे २०२४ पूर्वी) वित्त विभाग / सेवा-९ कार्यासनाकडे सादर करण्याबाबत नमूद केले आहे. या अनुषंगाने प्रस्ताव दिनांक १६.०५.२०२४ पूर्वी वित्त विभाग / सेवा-९ कार्यासनाकडे सादर करण्याबाबत संदर्भाधीन क्रमांक २ येथील पत्रांन्वये कळविण्यात आले आहे. तथापि, अद्याप काहीच मंत्रालयीन विभागांकडून प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. सध्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या कामकाजासाठी मंत्रालयीन विभागातील अधिकारी/ कर्मचारी हे कर्तव्य बजावत असल्याने, वेतनत्रुटी निवारण समिती समोर प्रस्ताव सादर करण्यास प्रशासकीय कारणास्तव २ आठवड्याची (दिनांक ३१.०५.२०२४) पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

सबब आपल्या विभागाच्या अधिनस्त असलेल्या शासकीय कार्यालयातील विभागाकडे प्राप्त झालेल्या सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी बाबतचे अहवाल प्रस्तुत शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक ३ व ४ येथील नमूद तदतुदीप्रमाणे कार्यवाही करुन दिनांक ३१.०५.२०२४ पूर्वी वित्त विभाग / सेवा-९ कार्यासनाकडे आपल्या अभिप्रायासह सादर करावेत, ही विनंती. तसेच दिनांक ३१.०५.२०२४ नंतर वेतन त्रुटी निवारण समितीकडे प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांचा विचार करण्यात येणार नाही.

state payment committee
state payment committee

2 thoughts on “राज्य वेतन त्रुटी निवारण समिती २०२४ – प्रस्ताव सादर करणेबाबत state payment committee ”

  1. I think that it is s poor salary to give us, I want to asalary as like a central government employee , plz increase the fitment factor
    Bakshi samitee is not correct to a primary Teacher , It does not give us any facility
    Pls provided many facility to a Teacher

  2. It appears that you know a lot about this topic. I expect to learn more from your upcoming updates. Of course, you are very much welcomed to my website UY4 about Content Writing.

Leave a Comment