राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार मागास प्रवर्गातील जातींमध्ये नव्याने शिफारशी करणे / वगळणे / दुरुस्ती करणे state magasvarg aayoug shifarashi
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने शासनास सादर केलेल्या अहवाल क्रमांक-५५ मधील शिफारर्शीनुसार इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील जातींच्या नोंदीमध्ये जातींचा समावेश करणे/वगळणे/जातींच्या नोंदीमध्ये दुरुस्ती करण्याबाबत.
वाचा:१) शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, क्रमांक: सीबीसी-१०/२००८/प्र.क्र.२३५/मावक५, दि.२५.०६.२००८.
२) शासन निर्णय, विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग, क्रमांकः सीबीसी-२०१९/प्र.क्र.७२/मावक, दि.०४.०६.२०१९.
३) शासन परिपत्रक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, क्रमांकः संकीर्ण-२०२४/प्र.क्र.३०८/मावक,
दि.०९.०१.२०२५
प्रस्तावना:-
महाराष्ट्र राज्याच्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील जातीच्या यादीमध्ये राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालानुसार वाचा येथे नमूद क्र.१, २ व ३ च्या शासन निर्णय / परिपत्रकान्वये काही नवीन जातींचा अंतर्भाव करुन/वगळून यादी अद्ययावत केलेली आहे.
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग यानी शासनास अहवाल क्रमांक-५५ सादर करुन त्याद्वारे गणिगा, कची/कच्ची/कच्छी, कोइरी, कोईरी, कोयरी, व कुशवाह आणि धोबी/परीट/वरठी/तेलगु मडेलवार (परीट) या जातीच्या नोंदीमध्ये जातींचा समावेश करणे/वगळणे/जातींच्या नोंदीमध्ये दुरुस्ती करण्याबाबत शिफारस केली आहे. त्यानुषंगाने मा. मंत्रीमंडळाने सदर शिफारसी मान्य केल्या असून सदर मान्यता विचारात घेता, महाराष्ट्र राज्याच्या इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या यादीमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णयः-
राज्य मागासवर्ग आयोगाने शासनास सादर केलेल्या अहवाल क्रमांक-५५ मधील शिफारशीनुसार विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाच्या उपरोक्त वाचा येथे नमूद दि.२५.०६.२००८, दि.०४.०६.२०१९ व दि.०९.०१.२०२५ रोजीच्या शासन परिपत्रक/निर्णयान्वये अंतिम करण्यात आलेल्या जाती/तत्सम जातीच्या यादीत बदल करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
०२. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने अहवाल क्रमांक ५५ मध्ये प्र.क्र.१९/२०१४, प्र.क्र.२९/२०१४, प्र.क्र.१४६/२०२२ अन्वये गंणिगा, कची/कच्ची/कच्छी, कोइरी, कोईरी, कोयरी, व कुशवाह आणि धोबी/परीट/वरठी/तेलगु मडेलवार (परीट) या पोटजातीच्या नोंदीमध्ये जातींचा समावेश करणे/वगळणे/जातींच्या नोंदीमध्ये दुरुस्ती करण्याबाबत समावेश करण्याबाबत सखोल पडताळणीअंती शासनास अभिप्राय सादर केले आहेत. सदर प्रकरणाबाबतची वस्तुस्थिती व गुणवत्ता विचारात घेऊन खालील तक्त्यात नमूदप्रमाणे शासन मान्यता देण्यात येत आहे:-
०३. सदर शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेले बदल हे शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून लागू होतील.
०४. सदरहू शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला असून, त्याचा संकेताक २०२५०३२६१३०३१६७९३४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने