मराठी राजभाषा दिन 27 फेब्रुवारी संपुर्ण माहिती state language day
मराठी भाषा दिवस (अन्य नावे जागतिक मराठी भाषा दिवस, मराठी भाषा दिन, मराठी भाषा गौरव दिन) हा जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी २७ फेब्रुवारीला पाळला जातो.
मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून पाळण्याची प्रथा सुरू झाली.
जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेतला. भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, हि समस्त मराठीजनाची मागणी आहे.
इये महाटिचीया नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, अशा शब्दांतून श्री ज्ञानदेवानी मराठीचा उल्लेख करता करता ब्रम्हविद्या म्हंटले आहे, शब्दब्रह्मही म्हंटले आहे.
याची यथार्थता आज मराठी भाषा गौरव दिनी प्रकर्षाने पटते.
अमृतातेही पैजासी जिंकणाऱ्या या माय मराठीचा मला सार्थ अभिमान वाटतो.
मराठी भाषा दिन हा नाशिकच्या कवी कुसुमाग्रजांचा वाढदिवस आहे. त्यांचा हा जन्म दिन मराठी भाषा दिन म्हणून पाळला जातो.
GIRI लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धान्य ऐकतो मराठी धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
मराठी असे आमुची मायबोली… म्हणजे मराठी भाषा हि आपल्यासाठी
फक्त एक भाषा नसून ममतेचे वात्सल्याचे बोल आहेत. जसे आईचे बोल
लेकरांसाठी हळुवार, प्रेमळ, असतात आणि प्रसंगी जी आई मुलांच्या
भवितव्यासाठी कठोर शब्द हि बोलू शकते तशीच हि आपली मराठी आहे.
हळुवार, गोड़, लाघवी, प्रेमळ शब्दांनी सजणारी आणि प्रसंगी वज्राहूनी
कठीण शब्दाने वार करणारी जिथे फक्त शब्दच सगळं काम करतात,
कुठल्याही शस्त्राची गरज मराठी शब्दांना लागत नाही. अशी हि माझी
मायबोली माझी मराठी.
मराठी साहित्यातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व, ज्ञानपिठ पुरस्कार विजेते साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधुन “मराठी राजभाषा दिवस” साजरा केला जातो.
ज्या माय मराठीने आपल्यावर सांस्कृतिक छत्र धरले, जिने आपल्याला लहानाचं मोठं केले, या बहुआयामी जगात स्वताः ला सिद्ध करण्याची धमक आपल्यामध्ये निर्माण केली, आपणाला व्यक्त होण्यासाठी जिने शब्दांची पखरण केली.
आज तिच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठीचा महंमंगल दिवस आहे. या निमित्ताने आज आपण मराठी भाषा दिनाच्या विविध कार्यक्रमात सहभागी होऊया.
सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणे शक्य नसेल तर आपला मित्र परिवार, कुटूंबिय यांच्यासमवेत मराठीचा जागर करू शकता.
अगदी घरातील सदस्य कुणी कथाकथन, कविता वाचन, परिच्छेद वाचन, नाट्य सादरीकरण, मराठी गाणी अशा माध्यमातून हे करता येऊ शकते.
आपणच आपल्या मुलाबाळांना हा मराठीचा समृद्ध वारसा दाखवायला हवा. आणि या निमित्ताने मराठी वापराचा व अभ्यासाचा वसा आपण घेऊन मराठीला समृद्ध करुया. आपणास मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!