
आनंदाची बातमी! या शैक्षणिक वर्षापासून मुलींना उच्चशिक्षण मोफत;20 लाख मुलींचे 1800 कोटींचे शुल्क शासन भरणार state government dicision
आनंदाची बातमी! या शैक्षणिक वर्षापासून मुलींना उच्चशिक्षण मोफत; राज्यतील 642 कोर्सेसचा समावेश; 20 लाख मुलींचे 1800 कोटींचे शुल्क शासन भरणार.
इयत्ता 12 वी नंतर उच्चशिक्षण घेणाऱ्या राज्यभरातील २० लाख मुलींना शासनाच्या माध्यमातून आता मोफत शिक्षण मिळणार आहे. यामध्ये अभियांत्रिकी, मेडिकल, फार्मसीसह जवळ जवळ ६४२ कोर्सेसचा समावेश केले आहेत त्याकरीता राज्य सरकारने प्रत्येक वर्षी १८०० कोटी रुपयांचा खर्च उचलणार आहे.
सोलापूर : इयत्ता 12 वी नंतर उच्चशिक्षण घेणाऱ्या
राज्यांतील २० लाख विद्यार्थिनींना शासनाच्या माध्यमातून आता
मोफत शिक्षण मिळणार आहे. त्यात अभियांत्रिकी, मेडिकल,
फार्मसीसह तब्बल ६४२ कोर्सेसचा समावेश असून त्यासाठी
राज्य शासन दरवर्षी १८०० कोटी रुपयांचा भार उचलणार आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी याच शैक्षणिक वर्षापासून
(२०२४-२५) होणार आहे.
इयत्ता 12 वी नंतर कुटुंबाच्या आर्थिक अडचणींमुळे अनेक हुशार मुलींना परिस्थिती अभावी शाळा सोडून द्यावी लागते. दुसरीकडे पुढील उच्च शिक्षणाचा खर्च परवडत नसल्याने अनेक पालक बारावीनंतरच मुलींचा विवाह लावून देतात. त्यामुळे मुलींचे उच्च शिक्षण घेण्याचे प्रमाण कमी झाले आहे ही खरी वस्तुस्थिती आहे. त्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे उच्चशिक्षणातील तब्बल ६४२ कोर्सेसचे शुल्क राज्य शासनातर्फेच भरले जाणार आहे.
मुलींच्या शिक्षणाची टक्केवारीचे प्रमाण वाढावे उच्चशिक्षणाचा खर्चामुळे मुलींचा बालविवाह रोखता यावा तसेच राज्य शासनाचा हा निर्णय फक्त विद्यार्थिनींसाठीच असेल . विद्यापीठाशी संलग्नित उच्च महाविद्यालयांमधील तब्बल २० लाख मुलींसाठी हा निर्णय ऐतिहासिक ठरणार आहे. हुशार असून देखील मुलींना उच्च शिक्षण घेता येत नाही परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नसल्यामुळे हा निर्णय गरीब समाजातील विद्यार्थिनींसाठी एक वरदान ठरणार आहे.
राज्य शासनाच्या नवीन निर्णयानुसार
• अंदाजे उच्च महाविद्यालये -5300
• उच्चशिक्षण घेणाऱ्या मुली-20 लाख
• निर्णयातील कोर्सेस-642
• शैक्षणिक शुल्काची रक्कम-1800 कोटी
उपसमितीचा निर्णय, आता लवकरच या ऐतिहासिक निर्णयाला कॅबिनेटमध्ये मोहर लागणार आहे
राज्यातील उच्चशिक्षण घेणाऱ्या जवळपास २० लाख मुलींना ६४२ कोर्सेस पूर्णपणे मोफत उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. आतापर्यंत या कोर्सेसची अर्धी फी सध्या शासनाच्या माध्यमातून भरली जात होती, परंतु आता संपूर्ण शुल्क राज्य शासनच भरणार आहे. त्यासंबंधीचा निर्णय यापूर्वीच मंत्रिमंडळाच्या उपसमितीत झाला होता. आता कॅबिनेटमध्ये त्यावर अंतिम निर्णय होणार असून लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये हा निर्णय होणार आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षापासूनच त्याची अंमलबजावणी होईल, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.
निकालानंतर प्रवेशावेळी फी भरावी लागणार का?
इयत्ता बारावीचा निकाल (मंगळवारी) जाहीर झाला असून मुलींची उच्चशिक्षणासाठी प्रवेश घेण्याची लगबग सुरू होईल. अनेकदा प्रवेश घेतानाच शैक्षणिक शुल्क भरावे लागते. पण, लोकसभा निवडणूक आचारसंहितेनंतर होणाऱ्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीमध्ये ‘मुलींना उच्चशिक्षण मोफत’चा अंतिम निर्णय होणार असल्याने मुलींना प्रवेश देखील मोफत मिळेल हे निश्चित आहे. पण, हा निर्णय कोणत्या मुलींसाठी (जात संवर्ग) लागू असेल व त्यासाठी उत्पन्नाची अट किती असेल, यासंबंधीचा निर्णय त्या कॅबिनेटमध्येच होईल, असे सांगितले जात आहे.
Row house gowalkot road Azad Nagar
I am writing this for education
I want to joined hi group for education
Jya mulina kmi tyanch ky tyana next sathi try krta yein na
I want to joined hi group for education
Jalna Maharashtra