जिल्हा परिषदांनी आणि उच्च माध्यमिक शाळा सुरू करण्यासंदर्भात शासन निर्णय start midal school

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जिल्हा परिषदांनी आणि उच्च माध्यमिक शाळा सुरू करण्यासंदर्भात शासन निर्णय start midal school

स्थानिक स्वराज्य संस्था (महानगरपालिका/ नगरपरिषद/जिल्हा परिषद) यांनी उच्च माध्यमिक शाळा सुरु करण्यासंदर्भात….

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसेवाडी (सणसवाडी) ता. शिरूर, जि. पुणे या इ.१ ली ते ८ वी च्या शाळेस जोडून माध्यमिक ते उच्च माध्यमिक (इ.९ वी ते इ. १२ वी) स्वंयअर्थसहाय्यित तत्वावर दर्जावाढ देण्याबाबत..

शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांकः नमाशा-२००९/(४९७/०९)/ माशि-१, दिनांक ११ जून, २००९.

२) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांचे पत्र क्र. शिसं / माध्य/ स्वयंअर्थ /२०२४-२५/ एस-४/२७१४, दि. २८/०५/२०२४.

प्रस्तावना :-

जिल्हा परिषद, पुणे अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसेवाडी (सणसवाडी), ता. शिरूर, जि. पुणे या इ.१ ली ते ८ वी च्या शाळेस जोडून माध्यमिक ते उच्च माध्यमिक (इ.९ वी ते इ. १२ वी) स्वंयअर्थसहाय्यित तत्वावर दर्जावाढ मिळणेबाबतचा प्रस्ताव संदर्भ क्र. (२) अन्वये शासनास प्राप्त झाला होता. उपरोक्त प्राथमिक शाळेस जोडुन माध्यमिक ते उच्च माध्यमिक दर्जावाढ परवानगी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

१. महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम, २०१२ (सन २०१३ चा ०१) अंतर्गत जिल्हा परिषद, पुणे यांचे परिक्षेत्रातील खालील नमुद प्राथमिक शाळेस जोडुन माध्यमिक ते उच्च माध्यमिक दर्जावाढ करण्यास सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून शासन स्तरावरुन परवानगी देण्यात येत आहे.:-

अटी व शर्ती :-

सदर प्राथमिक शाळेस जोडुन माध्यमिक ते उच्च माध्यमिक दर्जावाढ करण्याकरीता

आवश्यक व यापुढे येणाऱ्या कोणत्याही खर्चाकरिता, राज्य शासनाकडून प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष असे कोणतेही वित्तीय सहाय्य / अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार नाही. ॥. माध्यमिक शाळांबाबतचे शासनाचे प्रचलित धोरण व निकष यांचे पालन करणे तसेच शाळेमध्ये आवश्यक वर्गखोल्या, सर्व भौतिक व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देणे अनिवार्य राहील.

III. महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम, २०१२ अन्वये निर्धारित केलेल्या सर्व मानकांचे, अटींचे व शर्तीचे आणि या अधिनियमांन्वये शासनाने दिलेल्या निदेशांचे किंवा शासनाने वेळोवेळी विनिर्दिष्ट केलेल्या मानकांचे किंवा अर्टी व शर्तीचे पालन करणे अनिवार्य राहील.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०२४०६२८१५३९०४२४२१ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने

शासन निर्णय pdf download 

Leave a Comment