इ.10 परिक्षेचा निकाल 27 मे रोजी लागणार: मा.शालेय शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य  SSC result 2024

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इ.10 परिक्षेचा निकाल 27 मे रोजी लागणार: मा.शालेय शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य  SSC result 2024

State board ssc result 2024 महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण मंडळ यांच्याकडून घेण्यात आलेले इयत्ता 10 वी च्या परीक्षेचा निकाल येणाऱ्या 27 मे पर्यंत लागणार असल्याबाबतची माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री माननीय श्री दीपकरावजी केसरकर साहेब यांनी मुंबईमध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे.

पूर्वीच्या  माहितीप्रमाणे इयत्ता 10 वी च्या परीक्षेचा निकाल 4 जून पर्यंत लागणार असल्याचा अंदाज सांगण्यात आला होता परंतु माननीय शालेय शिक्षण मंत्री श्री दीपकरावजी केसरकर साहेब यांच्या दाव्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निकाला विषयी नवचैतन्य निर्माण झाले आहे राज्यातील 9 विभागीय मंडळांमार्फत इयत्ता 10 वी ची परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 रोजी घेण्यात आलेली होती.

इयत्ता 12 वी च्या विद्यार्थ्यांचे माननीय शालेय शिक्षण मंत्री श्री दीपकरावजी केसरकर साहेब यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी  शुभेच्छा दिलेले आहेत ते बोलताना पुढे म्हणाले की इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि ज्या मुलांना कमी गुण मिळालेले आहेत त्या मुलांनी पुन्हा परीक्षेला बसावे त्यांची पुनर्परीक्षा लवकरात लवकर घेण्याच्या सूचना देखील यावेळी त्यांनी दिलेले आहेत.

उद्यापासून इयत्ता अकरावीच्या प्रवेशाची ऑनलाईन नोंदणी सुरू होणार असून प्रवेशाचा पहिला भाग भरण्यास सुरुवात देखील केली जाणार आहे CBSE बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे तरी अकरावीच्या प्रवेशाचा दुसरा भाग राज्य बोर्डाचा निकाल लागल्यानंतरच सुरू करण्यात येणार आहे इयत्ता 10 वी च्या state board चा निकाल दिनांक 27 मे 2024 पर्यंत जाहीर करण्यात येणार आहे.

स्टेट बोर्डाने संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यामुळे पुढच्या आठवड्यात विद्यार्थ्यांना 10 वी चा निकाल उपलब्ध होणार असल्याचे माननीय शालेय शिक्षण मंत्री श्री दीपकरावजी केसरकर साहेब यावेळी म्हणाले आहेत.

 

2 thoughts on “इ.10 परिक्षेचा निकाल 27 मे रोजी लागणार: मा.शालेय शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य  SSC result 2024”

Leave a Comment