इ.१०वी व १२वी जुलै-ऑगस्ट २०२५ परीक्षेस खाजगीरित्या प्रविष्ट (अर्ज क.१७) होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन नावनोंदणी प्रक्रियेबाबत ssc hsc students exam 17th form
विषय-माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) जुलै-ऑगस्ट २०२५ परीक्षेस खाजगीरित्या प्रविष्ट (अर्ज क.१७) होणाऱ्या
विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन नावनोंदणी प्रक्रियेबाबत
उपरोक्त विषयास अनुसरुन कळविण्यात येते की, सद्यस्थितीत फक्त फेब्रु मार्च च्या परीक्षांसाठीच खाजगी विद्यार्थी म्हणून प्रविष्ट होण्यासाठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. तथापि अनेक विद्यार्थी पात्र असूनही मंडळाने दिलेल्या मुदतीत नावनोंदणी अर्ज भरू न शकल्याने अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाते. शैक्षणिक वर्ष वाया जावू नये म्हणून यावर्षी प्रथमच जुलै-ऑगस्ट २०२५ च्या परीक्षांसाठी खाजगी विद्यार्थी नाव नोंदणीसाठी संधी देण्यात येत आहे.
तेव्हा जुलै-ऑगस्ट २०२५ परीक्षेसाठी खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन नावनोंदणी अर्जाबाबतची कार्यवाही दिनांक १५/०४/२०२५ पासून सुरु करण्यात येत असून सदरील अर्ज मंडळाच्या संकेतस्थळावरुन भरावयाचे आहेत.
जुलै-ऑगस्ट २०२५ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी नावनोंदणी अर्ज (फॉर्म नं. १७) ऑनलाईन स्वीकारण्याच्या तारखा खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आल्या आहेत.
खाजगी विद्यार्थी म्हणून प्रविष्ट होण्यासाठी फेब्रु. मार्च २०२५ च्या परीक्षेचेवेळी ज्या अटी व शर्ती निर्धारित केलेल्या होत्या त्याच अटी व शर्ती जुलै-ऑगस्ट २०२५ च्या परीक्षेसाठी कायम राहतील,
सदर अर्ज फक्त नियमित शुल्काने घ्यावयाचे असून याकरिता विलंब/अतिविलंब । शुल्काची मुदत असणार नाही. व कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. याबाबत विभागीय मंडळ स्तरावरून सर्व संबधितांना कळवावे.
विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज व मूळ कागदपत्रे शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये जमा करावयाची आहेत. याबाबतची कार्यपध्दती खालीलप्रमाणे कळविण्यात येत आहे
विभागीय मंडळ स्तरावर खाजगी विद्यार्थ्यांचे अर्ज Maker / Checker पध्दतीने तपासावयाचे आहेत. शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांकडून प्रापा झालेले अर्ज नेमून दिलेल्या जिल्हा / तालुका मुसार संबंधित कर्मचाऱ्याला (Desk1 user) यांचे Login मध्ये उपलब्ध होत्तील.
२ संबंधित कर्मचाऱ्यांनी online पध्दतीने प्राप्त अर्ज तसेच कागदपत्रांची पडताळणी करुन स्वतःच्या अभिप्रायासह पात्र/अपात्र/अपूर्ण (Eligible / Non-eligible /Incomplete) असा शेरा ऑनलाईन पध्दतीने देऊन पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवावयाचे आहेत.
३ वरील प्रमाणे कार्यवाही केल्यावर संबंधित कर्मचाऱ्याच्या Login मध्ये कार्यवाही पूर्ण केलेल्या अर्जाची एकत्रित प्राप्त यादीतील (pdf) काढण्याची सुविधा दिलेली आहे. शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांनी त्यांच्या Login मधून प्राप्त यादीतील (pdf) सर्व नावनोंदणी अर्जाची व कागदपत्रांची पडताळणी करुन सदर यादीवर आपले अभिप्राय नोंदवावे व पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवावे, त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे पाठविण्यात आलेल्या सर्व अर्जाबाबत अंतिम निर्णय पात्र/अपात्र (Eligible / Non-eligible) असा शेरा ऑनलाईन पध्दतीने देऊन अर्ज निकाली काढावयाचा आहे
४ सदरची कार्यवाही दि.२५/०५/२०२५ पर्यंत सर्व विभागीय मंडळांनी पूर्ण करावयाची आहे. यासंदर्भातील सूचना या पत्रासोबत जोडण्यात आलेल्या असून सदरील सूचना आपल्या स्तरावरुन संबंधित शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांच्या निदर्शनास आणून द्याव्यात व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य मंडळास सादर करण्यात यावा.
जा.क्र.छ. संविमं/उमाक / 119 दि.११/०४/२०२५ प्रती,
(देविदास कुलाळ) सचिव,
प्राचार्य/ मुख्याध्यापक
राज्य मंडळ, पुणे-०४.
सर्व माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालये,
विभागीय मंडळ, छत्रपती संभाजीनगर
विषयः- माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वीं) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१रवी)
जुलै-ऑगस्ट २०२५ परीक्षेस खाजगीरित्या प्रविष्ट (अर्ज क्र. १७) होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या
ऑनलाईन नावनोंदणी प्रक्रियेबाबत..
संदर्भः राज्य मंडळ, पुणे यांचे पत्र क्र.रा.मं./ परीक्षा-३/१३५० दि.११.०४.२०२५ अन्वये.
उपरोक्त संदर्भाकित विषयान्ये सर्व माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य/मुख्याध्यापक मळविण्यात येते की, माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) जुलै-ऑगस्ट २०२५ परीक्षेस खाजगीरित्या प्रविष्ट (अर्ज क्र.१७) होणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन नावनोंदणी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरुन दि.१५.०४.२०२५ पासुन ते दि.१५.०५.२०२५ पर्यंत था कालावधीत कार्यवाही करण्यात यावी. सदरील अर्ज फक्त नियमित शुल्काने घ्यावयाचे असुन विलंब/अतिविलंब शुल्काची मुदत असणार नाही.व कोणतीही मुदत वाढ देण्यात येणार नाही. याची
नोंद घ्यावी