इ.10 वी 12 वी परीक्षेचे ऑनलाईन हॉलतिकीट दि.23 जानेवारी 2025 पासून डाऊनलोड करून घेणेबाबत ssc hsc online hallticket download 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इ.10 वी 12 वी परीक्षेचे ऑनलाईन हॉलतिकीट दि.23 जानेवारी 2025 पासून डाऊनलोड करून घेणेबाबत ssc hsc online hallticket download 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे-०४

विषयः फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र

(इ. १० वी) परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत…

!! प्रकटन !!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक गाव्ळाने प्राचार्य, शिक्षक विद्यार्थी व पालक यांना सूचित करण्यात येते की, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (ड. १२ वी) पर्गक्षा फेब्रुवारी-मार्च २०२५ साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे (Hall Ticket) ऑनलाईन (online) पध्दतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेत स्थळावर शुकवार दिनांक १०/०१/२०२५ रोजी Admit Card या link व्दारे download करण्याकरीता उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.

या संदर्भात कळविण्यात येते की,

१) मंडळाने उपरोक्त प्रमाणे उपलब्ध करून दिलेल्या प्रवेशपत्रांवर (Hall Ticket) जातीचा प्रवर्ग (Caste Category) या कॉलमची छपाई करण्यात आलेली होती. याबाबत लोकभावनेचा आदर करून मंडळ दिलगिरी व्यक्त करीत आहे. प्रवेशपत्रांवरील (Hall Ticket) सदरचा जातीचा प्रवर्ग (Caste Category) कॉलम रद्द करण्यात येत असून विद्याथ्यांची परीक्षेविषयक इतर माहिती आहे तशीच राहील याची नोंद घ्यावी. सदरची नव्याने तयार केलेली प्रवेशपत्रे (Hall Ticket) गुरूवार दिनांक २३/०१/२०२५ पासून Admit Card या link व्दारे download करण्याकरीता उपलव्ध करून देण्यात येत आहेत.

२) तसेच माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२५ साठी सर्व विभागीय मंडळातील विद्याथ्यांच्या प्रवेशपत्रावरील (Hall Ticket) जातीचा प्रवर्ग (Caste Category) हा कॉलम रद्द करण्यात येत असून सदरची प्रवेशपत्रे (Hall Ticket) ऑनलाईन (online) पध्दतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेत स्थळावर सोमवार दिनाक २०/०१/२०२५ रोजी दुपारी ०३.०० वाजलेपासून Admit Card या link व्दारे download करण्याकरीता उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

तसेच download संदर्भातील उर्वरित इतर सूचना व विद्याथ्यांची परीक्षाविषयक माहिती आहे तशीच कायम राहील, यात कोणताही बदल होणार नाही याची सर्व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक यांनी उपरोक्त बाबींची नोंद घ्यावी.

Join Now