HSC व SSC परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2025 ऑनलाइन आवेदन पत्र भरणे बाबतच्या सूचना परिपत्रक ssc and hsc online application filling
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र फेब्रुवारी-मार्च-२०२५ ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्याबाबतच्या सुचना.
शासनाचे परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा
१. फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेची आवेदनपत्रे मंडळाचे नव्याने तयार करण्यात आलेले संकेतस्थळ www.mahahsscboard.in वर Institute Login या Tab मधून भरावयाची असून त्याचा Login Id व Password हा मार्च २०२४ परीक्षेचे प्रात्यक्षिक /अंतर्गत मूल्यमापनाचे गुण भरण्यासाठी देण्यात आलेला Login Id व Password आहे तोच राहील.
२. फेब्रुवारी-मार्च २०२४ परीक्षेसाठी प्रात्यक्षिक गुण भरण्यासाठी तयार करण्यात आलेल्या Maker- Checker या दोन्ही Login मधून आवेदनपत्रे भरता येतील, पंरतू Pre-List काढणे, Challan तयार करणे इत्यादी कामे फक्त प्राचार्य/मुख्याध्यापक यांचे Checker Login (Sxxxxxxx_1) मधूनच करता येतील.
३. कोणत्याही User चा पासवर्ड विसरला असल्यास Login Page वर Forget Password ची लिंक देण्यात आलेली असून त्याद्वारे Registered Mobile वर प्राप्त झालेल OTP दिल्यास Registered Mobile व E-Mail वर Message द्वारे नवीन Password उपलब्ध होईल.
४. क. महाविद्यालय/शाळा च्या प्राचार्य/मुख्याध्यापक यांचा मुख्य Login (Sxxxxxxx_1) चा Password विसरला असल्यास तसेच Registered Mobile व E-Mail देखील उपलब्ध नसल्यास संबधीत विभागीय मंडळाशी संपर्क करून नवीन Mobile No व E-Mail Registered करण्यात येवून विभागीय मंडळामार्फत विहित कार्यपध्दतीचा अवलंब करून नविन Password Mobile व E-Mail वर Message द्वारे उपलब्ध करून देण्यात येईल.
५. क. महाविद्यालय/शाळा यांना Registered Mobile/E-Mail ID मध्ये बदल करावयाचा असल्यास संबधीत विभागीय मंडळाशी संपर्क साधावा.
६. पुनर्परिक्षार्थी किंवा CIS विद्यार्थ्यां करीता मागील ३ परीक्षांचा Data उपलब्ध करून दिलेला आहे. विद्यार्थ्यांना त्या त्या परीक्षेचा बैठक क्रमांक टाकून त्यांची जुनी माहिती उपलब्ध करून घेता येईल. CIS विद्यार्थ्यांसाठी त्यांचा बैठक क्रमांक त्या वर्षाच्या Online Data मध्ये उपलब्ध असणे आवश्यक आहे त्याशिवाय आवेदनपत्र भरता येणार नाही. मागील परीक्षेच्या बैठक क्रमांकावरून प्राप्त झालेल्या माहितीची पडताळणी करून आवश्यक त्या दुरूस्त्या करूनच आवेदनपत्र Submit करावे.