माध्य.शालान्त (इ.१० वी) उच्च माध्य प्रमाणपत्र परीक्षा (इ.१२ वी) जुलै ऑगस्ट-२०२४ चे गुणपत्रिका वितरणाबाबत ssc and hsc exam certificate
संदर्भ क्र. रा.मं./परीक्षा-२/३३९३ दिनांक २७/०८/२०२४ रोजीचे पत्र.
उपरोक्त संदर्भाकित विषयास अनुसरून आपणास कळविण्यात येते की, माध्यमिक शालान्त (इ.१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१२ वी) जुलै ऑगस्ट २०२४ परीक्षेचे गुणपत्रक व तपशिलवार गुण दर्शविणारे अभिलेख वाटप मंगळवार दि.०३/०९/२०२४ रोजी सकाळी ११.०० ते ५.०० या वेळेत खालील जिल्हा वितरण केंद्रावर करण्यात येणार आहे.
उपरोक्त दिनांक व वेळेत आपले प्रतिनिधीस अधिकार पत्रासह जिल्हा वितरण केंद्रावर पाठवावे.
हे ही वाचा
👉👉या विभागातील कर्मचाऱ्यांच्या संवर्ग नियतकालिक बदल्याबाबत शासन निर्णय
👉👉सीसीटीव्ही तक्रार पेटी व सखी सावित्री समिती स्थापन करणे बाबत
👉👉इयत्ता दहावी बारावी जून जुलै मध्ये झालेल्या परीक्षेचे प्रमाणपत्र मिळणे बाबत
👉👉वर्गामध्ये शिक्षकांचे फोटो लावणे बाबत
👉👉YCMOU शिक्षणक्रमांची सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ
महत्वाची सूचना –
माध्यमिक शालांत व उच्च माध्यमिक गुणपत्रिकेत काही श्रृटया (जसे नावातील तफावत, मिस प्रिंट, लोगो नसणे, स्वाक्षरी नसणे, इतर शाळेची गुणपत्रिका असल्यास व सदोष गुणपत्रिका इ.) असल्यास अशा गुणपत्रिका संकलन केंद्रावरच मंडळ प्रतिनिधीस हस्तांतरित करावी अथवा हस्तपोच मंडळात तात्काळ सादर करावी.