शाळा गुणवता मुल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) कामकाज प्रलंबित असल्या बाबत खुलासा सादर करणे sqaaf link completed
संदर्भ 1. मा. संचालक, रा.शै.सं व प्रप महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र दिनांक 27.02.2025
2. मा. संचालक, रा.शै.सं व प्रप महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र दिनांक 28.03.2025
उपरोक्त विषयाचे अनुषंगाने दिनांक 31.03.2025 रोजीच्या अहवालाचे अवलोकन केले असता असे निदर्शनास आले आहे की, उपरोक्त 1 ते 42 शाळा या Not Started मध्ये आहेत.
आपणास वेळोवेळी या कार्यालयाकडुन व तालुकास्तरीय यंत्रणेकडुन SQAAF अंतर्गत कामकाज पुर्ण करण्यासाठी सुचित करण्यात आलेले आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून 42 शाळांचे रजिस्ट्रेशन व माहिती अंतिम करण्याबाबत पाठपुरावा असुन आपणास सुचित करुनही अद्याप आपणाकडून कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. ही बाब गंभिर असुन कार्यवाहीस पात्र आहे.
वास्तविक पाहाता सर्व गटशिक्षणाधिकारी व केंद्रप्रमुख यांचे मार्फत दररोज प्रगती बाबत व शिल्लक शाळांबाबत आपणापर्यंत कळवून सुद्धा Not Started संख्या कमी होत नाही. ही बाब योग्य नाही. Not Started शाळांबाबत काही तांत्रिक अडचणी असल्यास त्या कळविणे व त्या सोडवून घेणे हे अपेक्षीत असताना या बाबत कोणतीही कार्यवाही आपल्यास्तरावरून झालेली दिसुन येत नाही. विहीत मुदतीत काम करणे अपेक्षीत असताना आपण कोणतीही कार्यवाही केलेली नाही.
तेव्हा उपरोक्त 1 ते 42 शाळा बंद आहेत असे समजून सदरील शाळा SQAAF / SARAL / UDISE PLUS मध्ये बंद का करण्यात येवू नये या बाबतचा खुलासा 24 तासाचे आत SQAAF अंतर्गत सर्व कार्यवाही करुन करावा. अन्यथा आपले काही म्हणणे नाही असे समजून आपले विरुद्ध व उपरोक्त 1 ते 42 शाळा बंद करण्याची कार्यवाही नियमानुसार करण्यात येईल, शाळा बंद झाल्यास होणाऱ्या परिणामास आपण स्वतः जबाबदार राहणार आहात याची नोंद घ्यावी.