०८ जागतिक महिला दिनावर दोन मिनिटांचे भाषण speech on women’s day
सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष प्रमुख पाहुणे व माझे गुरुजन वर्ग आणि जमलेल्या माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना प्रथमतः सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मै मेरी झांसी नही दूंगी असे म्हणणाऱ्या आणि इंग्रजांना ठणकावून सांगणाऱ्या संघर्ष करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई मुलींना स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करून देण्याच्या देणाऱ्या सावित्रीबाई फुले अशा सर्व स्त्रियांना स्त्रियांच्या कार्याला माझे वंदन.
दरवर्षीप्रमाणे आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो आठ मार्च 1908 मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क वस्त्र उद्योगातील हजारो स्त्रियांनी जमवून कामाचे तास कमी करणे व सुरक्षितता इत्यादी बाबी बाबत मागण्या केल्या होत्या व निदर्शने केली होती स्त्रियांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेला हा पहिला लढा होता.
सन 1910 च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत कलोराइटेगी यांनी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात यावा हा प्रस्ताव मांडला व तो पासही झाला तेव्हापासून हा दिवस साजरा केला जातो.
या दिवसाचा मुख्य हेतू महिला सबलीकरण करणे हा आहे हा दिवस महिलांप्रती आदर प्रेम आत्मसन्मान व्यक्त करण्याचा आहे स्त्रीला अनेक नाती जोपासावी लागतात श्री सन्मानाची सुरुवात आपण आपल्या घरापासून करावी तरच आपला भारत देश सुरक्षित सक्षम आणि बलवान होईल