०८ मार्च जागतिक महिला दिनावर तीन मिनिटांचे भाषण speech on women’s day
सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष उपाध्यक्ष प्रमुख पाहुणे तसेच माझ्या जमलेल्या बाल मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज ८ मार्च म्हणजेच जागतिक महिला दिन होय जागतिक महिला दिन साजरा करण्यासाठी आपण सारे जण एकत्र जमलेलो आहोत जागतिक महिला दिना विषयी मी आज तुम्हाला काही माहिती सांगणार आहे ती तुम्ही शांततेने ऐकून घ्याल अशी मी सर्वांना विनंती करते.
8 मार्च म्हणजेच आंतरराष्ट्रीय महिला दिन होय आजच्या दिवशी महिलांचा सन्मान केला जातो महिलांचा आदर केला जातो. परंतु हा आदर आणि सन्मान फक्त आजच्याच दिवशी मर्यादित न राहता आपण सर्वांनी दररोज महिलांचा आदर आणि सन्मान केला पाहिजे.
प्रत्येक घरामध्ये महिला आहेत मग त्यामध्ये पत्नी असेल आई असेल मुलगी असेल बहीण असेल किंवा आजी असेल अशा प्रकारचे अनेक भूमिका महिलांना निभवावे लागतात या भूमिका निभवत असताना त्यांना अनंत अडचणी येतात परंतु ते आपल्या अडचणी इतरांना सांगत बसत नाहीत तर त्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी त्या सदैव तत्पर असतात आपल्या कौशल्याने त्या व्यवस्थितरित्या हाताळतात.
पूर्वीच्या काळामध्ये महिलांना शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती महिलांना फक्त चूल आणि मूल पाहु दिले जायचे. परंतु काही काळानंतर म्हणजेच स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांविषयी अतिशय संवेदनशील होऊन कार्य केले स्त्रियांना शिक्षणाची दारी उघडी केली ज्यावेळेस क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे मुहूर्तमेढ रोवली त्यावेळेस म्हणजे 1848 रोजी भिडे यांच्या वाड्यात शाळा सुरू केली परंतु यासाठी मुलींना शिकवण्यासाठी महिला शिक्षिका त्यांच्याकडे नव्हत्या त्यामुळे त्यांनी सुरुवातीला आपल्या पत्नीला म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना प्रथम शिकवले आणि त्यांना नंतर अध्यापनाचे कार्य करण्यास सांगितले त्यांनी देखील ते आनंदाने स्वीकारले आणि अनेक मुलींना अनेक महिलांना त्यांनी सुशिक्षित बनवले त्यामुळे आज आपण जे काही महिलांचा विकास पाहत आहोत ते फक्त त्यामागे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आहेत.
एक म्हण आहे “शिकलेली आई घर पुढे नेई” याचा अर्थ असा होतो की एक महिला जर शिकली तर ती अनेकांना शिकवते परंतु पुरुष जर शिकला तर तो फक्त स्वतः शकतो यामुळे ही मन या ठिकाणी लागू पडते.
शंभर शिक्षक जेवढे संस्कार करू शकत नाहीत तेवढे संस्कार फक्त एक आई करते
आजच्या आधुनिक युगामध्ये महिला या मोठ्या पदावर विराजमान झालेले आहेत आपल्या देशाचा जर विचार केला तर आपल्या देशामध्ये आपल्या देशाच्या महामहीम राष्ट्रपती म्हणजे एक महिलाच आहेत देशांमध्ये मुख्यमंत्री पदावर देखील महिला आहेत सचिव पदावर असेल किंवा आयएएस आयपीएस पदावर देखील महिला आहेत आजच्या युगामध्ये तर सीमेवर लढण्यासाठी देखील महिला तयार आहेत महिला वैमानिक आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला अग्रेसर आहे पुरुषांच्या बरोबर नीच नाही तर पुरुषांच्याही पुढे महिला गेल्याचे दिसत आहे.
त्यामुळे महिलांचा सन्मान मान आदर फक्त एक दिवसा पुरता न करता कायमस्वरूपी महिलांना त्यांचा सन्मान केला पाहिजे आदर केला पाहिजे.
महिला सक्षमीकरणाकरता ,सबलीकरण न करता केंद्र सरकार विविध उपक्रम राबवत आहे बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या हाताला काम मिळवून देत आहे त्यामधून महिलांना रोजगार निर्मिती होत आहे महिलांच्या कौशल्यांचा विकास होत आहे महिला सक्षम बनत आहेत महिला स्वावलंबी बनत आहेत महिलांना कोणत्याही प्रकारे पुरुषांवर अवलंबून राहावे लागत नाही.
भारतामध्ये देखील अनेक महिला वीर होऊन गेल्या यामध्ये झाशीची राणी असेल राजमाता जिजाऊ असतील रमाई आंबेडकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अशा अनेक महिलांनी आहे त्या परिस्थितीमध्ये महिलांची सक्षमता दाखवून दिली.
आज जागतिक महिला दिन आपण साजरा करत आहोत या जागतिक महिला दिनानिमित्त सर्व माता माऊलींना हार्दिक शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत