स्वामी विवेकानंद जयंती छोटे भाषण मराठी 2024 speech on Swami Vivekananda’s
सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे तसेच माझे गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्र मैत्रिणींनो आज मी तुम्हाला स्वामी विवेकानंद जयंती निमित्त स्वामी विवेकानंद यांचे विचार सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्याल स्वामी विवेकानंद यांची जयंती आपल्या सर्वांना माहिती आहे ती म्हणजे 12 जानेवारी होय
स्वामी विवेकानंद हे कुशाग्र बुद्धिमत्तेचे, प्रतिष्ठित विद्वान, विचारवंत, लेखक होते. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 मध्ये कोलकाता येथे झाला. त्यांचे नाव नरेंद्रनाथ दत्त हो त्यांना स्वामी या नावाने ओळखले जाते
स्वामी विवेकानंद हे कुशाग्र बुद्धिमत्तेचे, प्रतिष्ठित
विद्वान, विचारवंत, लेखक होते. त्यांचा जन्म 12
जानेवारी 1863 मध्ये कोलकाता येथे झाला. त्यांचे
नाव नरेंद्रनाथ दत्त होते. पण नंतर त्यांना स्वामी
विवेकानंद या नावानेच ओळखले जावू लागले. स्वामी
विवेकानंद यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त होते
तर आईचे नाव भुवनेश्वरी देवी होते. नरेंद्रनाथ
म्हणजेच स्वामी विवेकानंद हे लहानपणापासूनच खूप
हुशार होते. त्यांनी इतिहास, तत्त्वज्ञान आणि साहित्य
यांच्याविषयी अभ्यास केला.
आईचे संस्कार आणि वडिलांची असलेले सामाजिक बांधिलकी या सर्वांमुळे नरेंद्रनाथ यांच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम झाला. यातूनच ते घडत गेले आणि नरेंद्र यांचे विवेकानंद असे नाव झाले. अनेकजण त्यांना आदराने स्वामीजी असे हाक मारत असतं.
स्वामी विवेकानंद यांनी जगभरात सनातन धर्म आणि भारतीय संस्कृतीचा प्रसार करत जगाला भारतीयांची ओळख करुन दिली. स्वामींनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली.
स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे शिकागो येथे भरलेली सर्वधर्म परिषदेतील भाषण होय. या भाषणातून स्वामींनी सर्वांचीच मने जिंकली.
स्वामी विवेकानंद यांच्याविषयी माहिती देणारे हे लहानसे भाषण शालेय विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धा किंवा इतर कार्यक्रमात करु शकतात.