भारतीय प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी छोटे मराठी भाषण speech on republic day
नमस्कार मंडळी मी इयत्ता पहिली. अध्यक्ष महोदय, गुरुजनवर्ग आणि माझ्या बालमित्रांनो… आज मी तुम्हाला प्रजासत्ताक दिन निमित्त दोन शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणे एकून घ्यावेत अशी मी आपणास नम्र विनंती करत आहे.
बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एकचि भारत देश हा… भारत देश हा !
नद्या नाल्यांनी बहरलेला … गिरी शिखरांनी डवरलेला आणि या दिमाखदार तिरंग्याने तेजस्वी झालेला माझा प्रिय भारत देश. गौरवशाली इतिहास असणाऱ्या या भारतमातेची आपण सारेच लेकरे आहोत याचा मला आनंद वाटतो आणि अभिमानही वाटतो. जे देशासाठी लढले आणि थोर हुतात्मे झाले त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. ज्यांनी भारताची घटना तयार केली अशा महापुरुषांना वंदन करतो आणि माझे हे छोटेसे भाषण पुरे करतो.
जय हिंद ! जय महाराष्ट्र !