भारतीय प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी मराठी भाषण speech on republic day
महोदय अध्यक्ष, सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन, आणि माझे सर्व देशप्रेमी बांधव ! या मंगलमय क्षणी या प्रांगणात जमलेल्या सर्वाचेच मी प्रथमतः मनपूर्वक स्वागत करत आहे ! आजच्या गौरवदिनानिमित्त मी “गाथा ही स्वातंत्र्यवीरांची, कथा ही स्वातंत्र्यलढ्याची” या विषयावर माझे मनोगत व्यक्त करत आहे….! मित्रहो…! रत्नाचे तेज पारखायला कोण्या एका
रत्नपारख्याची गरज असते का ? चिमणीच्या पोटी कधी गरुडाने जन्म घेतला आहे का ? रातराणीच्या सुगंधाची चर्चा करावी लागते का ? नाही ना ? …. त्याचप्रमाणे ज्या देशाचे स्वातंत्र्य अनेक थोर नेत्यांच्या त्याग आणि बलिदानातून प्राप्त झाले आहे. तो देश आता प्रजासत्ताक बनलाय हे सांगण्यासाठी कुण्या तत्त्ववेत्त्याची गरज आहे का ? निश्चितच नाही !
मित्रहो….! आपला इतिहास पूर्ण विश्वात सर्वात अगळावेगळा आहे ! याला सत्य, अहिंसा, शांती यांचा आधार असून त्याग, शौर्य आणि क्रांतीचीही किनार आहे ! इंग्रज व्यापारी म्हणून आले आणि इथले राज्यकर्तेच झाले. ज्या देशातून एके काळी सोन्याचा धूर निघत होता, त्या देशात चुलीतूनही धूर निघणेही अशक्य बनले. बघता बघता सारा देश इंग्रजांच्या जोखडात अडकत गेला. त्यातून बाहेर पडणे भारतीयांना आता अवघड झालं. लढ्यास खरी सुरवात झाली ती लोकमान्यांच्या सिंहगर्जनेने ! भगतसिंग, सुखदेव, राजगुरू हसत हसत फासावर गेले. अनेकांनी संसार सोडला, घरादारावर तुळसीपत्र ठेवले, स्वतःच्या अंगावर गोळ्या झेलल्या. खरा दबाव निर्माण झाला तो गांधीच्या सत्याग्रह आंदोलनामुळे ..!
गांधी युग सुरु झाले आणि स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल सुरु झाली. असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग, मिठाचा सत्याग्रह, छोडो भारत चळवळ हा गांधीयुगाचा महत्त्वाचा भाग होता. जवळ जवळ १५० वर्षांनी भारत देश स्वतंत्र झाला…तो १५ ऑगस्ट १९४७ रोजी. स्वातंत्र्य मिळून आज जवळ जवळ ७० वर्षे होत आलीत. आपण तंत्रज्ञानाच्या दृष्टीने बरीच प्रगती केली पण आजही दहशतवाद, भ्रष्टाचार, बेकारी यासारख्या अनेक समस्या देशासमोर उभ्या आहेत. अतिशय शालीन आणि उच्च संस्कृती लाभलेला आपला भारत देश ! आचार्य विनोबा भावेंनी भारतीय संस्कृतीचे अतिशय सुरेख वर्णन केले आहे, “भूक असताना खाणं ही प्रकृती, भूक नसताना खाणे ही विकृती, भूक असताना आपल्यातील घास दुसऱ्याला देणं ही झाली संस्कृती !” संस्कृतीचे खरे देणं आपणास लाभले ते राजा शिवरायांकडूनच…..! शिवरायांनी रयतेला स्वराज्य मिळवून देण्यासाठी आपले प्राण पणाला लावले. तसेच आपले प्राणप्रिय विश्वासू मावळे गमावले. म्हणून म्हणतो,
आरं.. आलं आलं वादळ, कोण आडवी त्या वादळा !
आलंच कोणी आडव, तर त्याचा वाजवू खुळखुळा !
नाद करू नका, आमचा नादच खुळा !
छाती ठोकून सांगतो, मी शिवबाचाच मावळा !
या सर्वांच्या आशीर्वादामुळे आपणास स्वराज्य मिळाले पण सुराज्याच काय…..? आजचे युवक मात्र आज whats app, facebook, tick tock च्या नादात असतात. पूर्वी सुभाषचंद्र बोस म्हणत, “तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी ढुंगा । पण आत्ताचे युवक म्हणतात, “तू मला तंबाखू दे, मी तुला चुना देतो !”
गांधी युग सुरु झाले आणि स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल सुरु झाली. असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग, मिठाचा सत्याग्रह, छोडो भारत चळवळ हा गांधीयुगाचा महत्त्वाचा भाग होता. जवळ जवळ १५० वर्षांनी भारत देश स्वतंत्र झाला… तो १५ ऑगस्ट १९४७ रोजी. स्वातंत्र्य मिळून आज जवळ जवळ ७० वर्षे होत आलीत. आपण तंत्रज्ञानाच्या दृष्टीने बरीच प्रगती केली पण आजही दहशतवाद, भ्रष्टाचार, बेकारी यासारख्या अनेक समस्या देशासमोर उभ्या आहेत. अतिशय शालीन आणि उच्च संस्कृती लाभलेला आपला भारत देश ! आचार्य विनोबा भावेंनी भारतीय संस्कृतीचे अतिशय सुरेख वर्णन केले आहे, “भूक असताना खाणं ही प्रकृती, भूक नसताना खाणे ही विकृती, भूक असताना आपल्यातील घास दुसऱ्याला देणं ही झाली संस्कृती !” संस्कृतीचे खरे देणं आपणास लाभले ते राजा शिवरायांकडूनच…..! शिवरायांनी रयतेला स्वराज्य मिळवून देण्यासाठी आपले प्राण पणाला लावले. तसेच आपले प्राणप्रिय विश्वासू मावळे गमावले. म्हणून म्हणतो,
आरं.. आलं आलं वादळ, कोण आडवी त्या वादळा !
आलंच कोणी आडव, तर त्याचा वाजवू खुळखुळा !
नाद करू नका, आमचा नादच खुळा !
छाती ठोकून सांगतो, मी शिवबाचाच मावळा !
या सर्वांच्या आशीर्वादामुळे आपणास स्वराज्य मिळाले पण सुराज्याच काय…..? आजचे युवक मात्र आज whats app, facebook, tick tock च्या नादात असतात. पूर्वी सुभाषचंद्र बोस म्हणत, “तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी ढुंगा । पण आत्ताचे युवक म्हणतात, “तू मला तंबाखू दे, मी तुला चुना देतो !”
असं म्हणतात की, “आयुष्यातील प्रत्येक दिवस खास असतो !” पण मला वाटतं… स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन यांच्याइतका कोणताच दिवस खास आणि महत्वाचा असू शकणार नाही !
कारण याच दोन दिवसांनी आपल्याला दिलाय….
तो आनंद… स्वातंत्र्याचा ! तो आनंद… माणूस म्हणून जगण्याचा ! तो आनंद… देशभक्तीचा ! तो आनंद… तिरंग्यावर जीव ओवाळून टाकण्याचा ! तो आनंद… महात्म्यांच्या बलिदानावर मान झुकवण्याचा ! तो आनंद… देशाप्रती कर्तव्य बजावण्याचा ! तो आनंद भारतीय बनण्याचा !
सर्वांचा निरोप घेता समयी इतकेच सांगावेसे वाटते….. “ज्या भूमिपुत्रांनी दिली प्राणाची कुर्बानी, रंगविला इतिहास आपल्या रक्तांनी, पेरुनी घेतले काटे स्वतःच्या जीवनी, अमर आहे त्यांची स्वातंत्र्यकहाणी ! श्रद्धांजली वाहतो त्यांना या स्वातंत्र्यदिनी !
जय हिंद ! जय भारत ! वंदे मातरम ।