भारतीय प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी मराठी भाषण speech on republic day
नमस्कार मंडळी ! आज १५ ऑगस्ट ! आपला स्वातंत्र्यदिन ! आपला राष्ट्रीय सण ! आपला सर्वश्रेष्ठ दिवस ! आणि या मोठ्या प्रसंगी माझ्या सारख्या छोट्या व्यक्तीला आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद !
या शुभप्रसंगी माझे पहिले वंदन त्या पवित्र भारतमातेला जिच्या उदरात आपण जन्म घेतला, जिच्या मुक्तीचा हा अखंड सोहळा आपण साजरा करतोय ! माझे दुसरे वंदन त्या तिरंग्याला जो देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा खरा साक्षीदार आहे, खरा मानकरी आहे, माझे तिसरे वंदन माझ्या लाडक्या राजाला, माझ्या शिवरायांना ज्यांनी या मराठी मातीत जन्म घेवून स्वराज्याचे आणि सुराज्याचे पहिले वहिले स्वप्न पहिले आणि ते साकार केले. चौथे माझे वंदन थोर महात्म्यांना आणि त्या हुतात्म्यांना ज्यांच्या त्याग आणि बलिदानातून या भूमीवर स्वातंत्र्याचा सूर्योदय झाला. पाचवे वंदन करितो मी आपणा सर्वांना कारण तुम्हीच आहात या देशाचे खरे शिल्पकार… खरे वारसदार !
मित्रहो ! या छोट्या बालकाचा आपणा सर्वांना एक छोटा प्रश्न आहे. सांगा पाहू आपण हा स्वातंत्र्यदिन का साजरा करतो ? आता कोणी म्हणेल, “नवीन कपडे घालण्यासाठी” कोणी म्हणेल, “प्रभात फेरी काढण्यासाठी, देशभक्तीपर गीते ऐकण्यासाठी” कोणीतरी म्हणेल, “गोळ्या, जिलेब्या खाण्यासाठी” नाही मित्रांनो ! आजच्या या महान दिवसाची आपणास किंमतच करता येणार नाही की तुलनाही करता येणार नाही! आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्याची विजयी पताका आसमानात याच दिवशी फडकली होती. आपल्या
अमर इतिहासाचा हा सन्मानदिन आहे, स्मरणदिन आहे. “इकडून आला पोस्ट.. तिकडून आला पोस्ट आणि झाली माझी गोष्ट ोष्ट ।” !” इतकी सहज-साधी आणि संपणारी आपली स्वातंत्र्याची गोष्ट नाही. अनेकांच्या त्यागाने, बलिदानाने, नेतृत्वाने आणि कर्तृत्वाने सजलेला भारताचा इतिहास आहे. साऱ्या जगाला सत्य, अहिंसा, न्याय व शांतीचा संदेश देणारा, तिमिरातुनी तेजाकडे जाणारा आपला प्रेरणादायी इतिहास आहे. पण मित्रानो ! इतकी पुण्याई मिळूनही काही प्रश्न मात्र माझ्या डोक्यात घोंघावत आहेत. खरच ! आपणाला स्वातंत्र्याचा अर्थ समजला का ? खरचं ! आपण संपूर्णपणे स्वतंत्र झालो आहोत का ? जर आपण छातीठोकपाने ‘होय’ म्हणत असाल तर माझे आपणास काही रोखठोक प्रश्न आहेत. आज पुरुषाइतकी स्त्री घरात, समाजात, शिक्षणात स्वतंत्र आहे का ? मुक्त आहे का ? नाही ना ! अहो हा विषय तर सोडाच पण या अबलाला अजून या भूमीत जन्मच घेण्याचे स्वातंत्र्य राहिले नाही !
आज आपणास स्वातंत्र्य मिळून जवळपास ७० वर्षे पूर्ण झाली पण धर्मवाद, जातिवाद, भाषावाद, प्रांतवाद या विनाशी आणि विषारी पगड्यातून मुक्त झालो आहोत का ? ‘भ्रष्टाचार’ आणि ‘महागाई’ यासारखे राक्षस नष्ट होण्याऐवजी भस्मासूर झालेत ! यांचा विळखा इतका आवळत चालला आहे की, माझ्या 35/53 T शेतकरी, मजूर बंधावासमोर आज फास घेण्याशिवाय राहिलाय का ? असंख्य प्रदूषणानी आज इतका चहुबाजूंनी घेराव घातला आहे की, आरोग्यपूर्ण जगणेही आज मुश्कील झाले आहे. आमच्या पूर्वजांनी जीवाचे रान करून गड, किल्ले, आणि भव्य वास्तू उभ्या केल्या; पण त्या केवळ जतन करण्याची, स्वच्छ राखण्याची नैतिकता आज आपल्याजवळ फारशी शिल्लक नाही. मग हा आपल्या राष्ट्रीय संपत्तीचा हास न्हवे का ?
आता तुम्हीच सांगा मित्रानो ! याला स्वातंत्र्य म्हणायचे की, स्वैराचार म्हणायचा ? ह्याचे कधीतरी चिंतन झाले पाहिजे ! हे कुठेतरी थांबले पाहिजे ! बर.. याला जबाबदार कोण ? ‘आपणच’ ! बर यावर उपाय कोण करू शकते ? याचेही उत्तर ‘आपणच’ ! सर्वाना चांगले काय वाईट काय याची पूर्ण समज आहे पण आचरणात कोणी आणत नाही. इथे जमलेल्या प्रत्येकाने दररोज देशाची प्रतिज्ञा म्हंटली आहे. केवळ मराठीत नाही तर हिंदी व इंग्रजीमध्येही तोंडपाठ केली. पण प्रत्यक्षात आचरणात किती ? हा मोठा प्रश्न आहे !
आपण म्हणतो, “सारे भारतीय माझे बांधव आहेत” मग जातीधार्मावरून जा रक्तरंजित हिंसाचार का ? आपण म्हणतो, “वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन” अहो इतर सोडा ! आज स्वतःच्या आईवडिलांचा सांभाळ करणारे शोधावे लागतात. “देशाच्या परंपरांचा पाईक होण्याची” आपण शपथ घेतली खरी, पण आज मात्र सर्वजण पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करत आहेत. स्वातंत्र्यदेवतेची चाललेली ही विटंबना कुठेतरी थांबली पाहिजे. केवळ १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी साजरी करून घोषणा देवून आपले देशप्रेम सिद्ध होत नाही. आपली जबाबदारी संपत नाही. आपल्या महात्म्यांनी व हुतात्म्यांनी देशाचे पाहिलेले उज्ज्वल स्वप्न आपणास साकार करायचे आहे ! या देशाला महासत्ता बनवायचे आहे ! हीच खरी मानवंदना आहे आणि हीच खरी श्रद्धांजली आहे !
आज लहान तोंडी मोठा घास घेवून मी माझे दोन शब्द व्यक्त केलेत. माझे हे बोबडे बोल आपण ते शांतपणे ऐकून घेतलेत याबद्दल आपले आभार मानतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो !,
जय हिंद ! जय महाराष्ट्र !