02 ऑक्टोबर 2024 महात्मा गांधी जयंतीनिमित्त सुंदर भाषण speech on mahatma gandhi jayanti 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

02 ऑक्टोबर 2024 महात्मा गांधी जयंतीनिमित्त सुंदर भाषण speech on mahatma gandhi jayanti 

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष प्रमुख पाहुणे व माझे गुरुजन वर्ग तसेच माझ्या बाल मित्रांनो मी तुम्हाला आज महात्मा गांधी जयंती विषयी दोन शब्द सांगणार आहे त तुम्ही शांततेने ऐकून घ्याल ही नम्र विनंती करतो

आज आपल्या शाळेमध्ये महात्मा गांधी जयंती साजरी करण्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत महात्मा गांधींविषयी बोलायचे झाले तर ते एक महान सुधारक होते त्यांनी आपल्या जीवनातील परवाना करतो स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी खूप मोठे प्रयत्न केले त्यामुळेच असे म्हटले जाते

“जगातील महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइनने महात्मा गांधीबाबत असे म्हटले होते की, भविष्यात येणाऱ्या पिढ्यांना यावर विश्वास ठेवणे कठीण होईल की हाडा मासांचा बनलेला असाही एखादा व्यक्ती पृथ्यीवर जन्माला आला होता. आजच्याच दिवशी म्हणजेच २ ऑक्टोबरला या महान व्यक्तीचा जन्म झाला होता. या महत्वाच्या दिवशी आपण त्यांचे महान विचार आणि त्यांनी जगाला दिलेला संदेश जाणून घेण्यास एकत्र जमलो आहोत. सर्वप्रथम मी त्यांना नमन करते/करतो आणि आपल्या भाषणाला सुरुवात करते/करतो. संपूर्ण जगावर ज्यांच्या विचारांचा आजही प्रभाव दिसून येतो ते आपले बापू अर्थात महात्मा गांधी. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी पोरबंदर येथे झाला. लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणून हाक मारायचे.

गांधीजींनी भारताला ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अनेक मोठ मोठी आंदोलने केली. चले जाव आंदोलन, भारत छोडो आंदोलन यांसारख्या आंदोलनातून त्यांनी लाखो भारतीयांना एकत्र आणले आणि एकजूटीने ब्रिटीशांविरोधात शांतीच्या मार्गाने लढा दिला. (Mahatma Gandhi Jayanti)

गांधीजींचा जन्म दिवस २ ऑक्टोबर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणूनही ओळखला जातो. त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेत त्यांचे विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. ही त्यांना दिलेली खरी आदरांजली ठरेल.

संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो तसेच आपणही माझे भाषण शांततेने ऐकून घेतले त्याबद्दल मी आपले आभार मानतो व माझे भाषण संपवतो जय हिंद जय भारत