भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती मराठी भाषण speech on lokmanya tilak jayanti
भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते या भारताचे युग पुरुष आदरणीय लोकमान्य टिळक यांचा आज स्मृतीदिन.
लोकमान्य टिळकांचा जन्म रत्नागिरी मध्ये 23 जुलै 1856 रोजी झाला… लहानपणा पासूनच टिळक आक्रमक स्वभावाचे होते. विद्यार्थी दशेत मुलांच्या छोट्या संघटना करून ते त्याचे नेते बनत…. त्यांना व्यायामाची आणि कुस्ती ची फार आवड होती. तालमीत नियमितपणे व्यायाम करून घाम आल्याशिवाय व्यायाम बंद करायचे नाहीत.
जे सरकार आपल्याला सन्मानाने जगू देत नाही त्यांना राज्य करण्याचा अधिकार नाही, अशा परखड मताचे बाळ गंगाधर टिळक हे लोकांचे लोकमान्य नेते होते. स्वातंत्र्य हे आंदोलने उपोषने करून मिळत नाही तर: ‘मनगटातील ताकतीने तलवारीच्या जोरावर ते मिळवावे लागते,’ असे मराठी माणसाला ठासून सांगणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक.
पुण्यात प्लेगची साथ आली…. तत्कालीन गव्हर्नर रँड साहेबाने उंदीर मारण्यासाठी फवारणी सुरू केली…. फक्त फवारणीच नाही तर मराठी माणसांची घरे दारे इंग्रजी फौजानी लुटायला सुरुवात केली… फवारणीच्या नावाखाली अत्याचार करायला सुरुवात केली….उंदरांवर फवारणी करायच्या निमित्ताने देव्हाऱ्यातील देव सुद्धा सोडले नाहीत… देवांची विटंबना केली…त्यातच महारष्ट्रात मोठा दुष्काळ पडला तरीदेखील इंग्रजांनी कर वसुली थांबवली नाही. इंग्रज जबरदस्तीने कर वसुली करूच लागले. हे टिळकांना पाहावले नाही त्यांनी आपल्या केसरी या मराठी वृत्तपतत्रात, “सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असा ठणकावून जाब विचारला”…. त्यामुळे त्यांना अटक झाली… मांडले च्या तुरुंगात त्यांना कालकोठडीची शिक्षा झाली…. तरी टिळक डगमगले नाहीत… तेथूनच त्यांनी इंग्रजांना इशारा दिला तुम्ही कितीही अत्याचार करा, मारा पण; मी माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब असे पर्यंत या मातृभूमीच्या रक्षणासाठी लढत राहीन. पुढे ते लाला लजपतराय यांच्या बरोबर क्रांतिकारकांच्या लढ्यात सामील झाले. क्रांतीकारकांना मदत करू लागले इंग्रजांविरुद्ध उठाव करू लागले मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी अहोरात्र लढत राहिले …ते म्हणतात, “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच”… अशा या थोर क्रांतिकारकाला माझा कोटी कोटी प्रणाम
आदरणीय व्यासपीठ व व्यासपीठावरील मान्यवर मी आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त आपल्या समोर अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी काही शब्द मांडणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी विनंती.
आण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला. लहानपणापासून त्याना वाचन लेखनाची फार आवड होती. त्यांचे खरे नाव तुकाराम तर, वडिलांचे नाव भाऊ पण लोक प्रेमाने त्याना आण्णा म्हणत, म्हणून ते सामान्य लोकांचे आण्णाभाऊ झाले. ते एक थोर समाजसुधारक होते. समाजसुधारक म्हणजे समाजाला योग्य मार्गदर्शन करणे व समाजातील समाजविघातक चालीरीती व परंपरा यांना विरोध करून लोकांना जागृत करणे तसेच अनिष्ठ प्रथा नाहीशा करणे होय.
आण्णाभाऊ साठे यांच्याविषयी बोलायचे झाले तर,ते एक आदर्श नेता होते. इंग्रजी शासनाच्या पुढे त्यांनी कधीच गुढगे टेकले नाहीत. त्यांना कळू लागले तेंव्हा ते शाळेत जाऊ लागले पण ; जातिव्यवस्थे मुळे त्याना शाळेत सवर्ण मुलांनी बसू दिले नाही. म्हणून घरात राहूनच त्यांनी अक्षर ओळख करून वाचन करायला सुरुवात केली. पुढे कथा कादंबरी तसेच पोवाडा लेखनाला सुरुवात केली.
महाराष्ट्र एकीकरण चळवळीत त्यांचा सक्रीय सहभाग होता. गिरणी कामगार व शेकऱ्यांच्या जीवनावर त्यांनी भरपूर पोवाडे लिहिले. शाहीर अमर शेख यांच्या बरोबर त्यांनी विविध लावण्या व पोवाडे लिहिले म्हणून ते लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध झाले. कादंबरी लेखनातून त्यांनी कामगार कष्टकरी जनतेचे व मागास समाजाचे प्रश्न प्रामुख्याने मांडले. जातिभेदाला आणि उचनिचतेला त्यांनी कडाडून विरोध केला आणि स्वतःला उच्चभ्रू समजणाऱ्या समाजाला त्यांनी ठणकावून सांगितले पृथ्वी ही शेषनागाच्या डोक्यावर तरली नसून टी कष्टकरी व कामगारांच्या मनगटावर तरलेली आहे.
अशा या थोर समाजसुधारकला कोटी कोटी प्रणाम!
राष्ट्रपिता महात्मा गांधी
भारत देशाचे राष्ट्रपिता म्हणून ज्याना ओळखले जाते असे थोर पुरुष म्हणजे महात्मा गांधी. महात्मा गांधींचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ ला गुजरात मध्ये पोरबंदर येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. भारतीय इतिहासात त्यांना विशेष महत्व आहे. भारत हा खेड्यांचा देश आहे म्हणून खेड्यातील शेतकरी समृद्ध झाला पाहिजे असे त्यांना वाटायचे सामान्य लोखांच्या हक्कासाठी त्यांनी विविध आंदोलने उभारली.
आपले काम आपणच केले पाहिजे याविषयी ते आग्रही आसायचे. गुलामगिरी तसेच पारतंत्र्य याविरुद्ध त्यांनी अहिंसा व सत्याग्रहाच्या मार्गाने लढा उभारला. सत्याग्रह म्हणजे सत्याचा आग्रह
स्वतंत्र भारतासमोरील आव्हाने
जहा डाल डाल पर सोने कि चिडीया करती है बसेरा,
वह भारत देश है मेरा वह भारत देश है मेरा.
आशा या सुवर्ण भारताचे साक्षीदार तुम्ही आणि आम्ही, २०० वर्षे इंग्रजी सत्तेच्या पायाखाली दबलेल्या, पिचलेल्या समाजाने एकसंघपणे १९४७ साली ते जुलमी दोरखंड तोडून सुटकेचा निश्वास सोडला आणि नवीन भारताचे आधुनीक स्वप्न उराशी बाळगून जगाच्या नकाशावर नवे अस्तित्व निर्माण करण्यासाठी शिवधनुष्य आपल्या हाती घेतले.
आज या घटनेला ७५ वर्षे पूर्ण झाली व आपण सार्वजन त्या क्रांतीचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. १४ ऑगस्ट च्या रात्री ब्रिटीश सत्तेने भारतीय प्रशासनाच्या चाव्या भारतीयांना सुपूर्द केल्या आणि अखंड चालत आलेल्या गुलामीतून सुटका झाल्याची भावना जनमानसामध्ये तयार झाली. सर्व भारतीयांनी १५ ऑगस्ट हा दिवस गुढ्या उभारून साजरा केला. एका नवीन युगाची नवीन पर्वाची नांदी सुरु झाली. तो दिवस सर्वजन मनापासून जगले पण; पुढे काय? दुसरा दिवस १६ ऑगस्ट १९४७ ला या भारत मातेला लंकेची पार्वती करून सोडले होते. स्वयंपूर्ण खेडी बेचिराख झाली होती. शहरांमध्ये लोकांच्या हाताला काम नव्हते. गुन्हेगारी बोकाळली होती. लोकांचे उपासमारीने जीव जात होते. दोन वेळचे सोडा लोकाना एकवेळचे अन्न सुद्धा मिळत नव्हते. कोरडवाहू जमिनी, सिंचनाच्या सोयी सुविधा नव्हत्या. अन्नधान्य पिकत नव्हते. अशा दिवाळखोरीत निघालेल्या भारताला पुढे घेऊन जाण्याचे मोठे आव्हान भारतासमोर होते पण; छ. शिवाजी महाराज, महाराणा प्रताप अशा पुरुषाना आदर्श मानत भारतमातेच्या सुपुत्रांनी ही आव्हाने लीलया पेलली आणि भारतच्या सुवर्णयुगाची स्वप्ने साकार झाली.
कृषिप्रधान असलेल्या भारताला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केले. शेतीपूरक व्यवसाय करून गरीब शेतकऱ्यांनी ओउद्योगिक प्रगती केली. धरणे कालवे अशा सिंचनाच्या सोयी निर्माण करून या भारतमातेला सुजलाम-सुफलाम केले. या भारताने शेतावरच्या बांधा पासून ते मंगळावर आपले अस्तित्व सिद्ध करून जगाला अवाक् करून सोडले आहे. संपूर्ण पृथ्वीला अभिमान वाटेल अशा लोकाभिमुख सुविधा निर्माण करून तंत्रज्ञानामध्ये जगाचे नेतृत्व करू शकतो हे सुद्धा सिद्ध केले आहे. ‘बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो’ या उक्तीप्रमाणे विश्वाला कौतुक वाटेल असे काम भारताने करून दाखवले आहे पण; या एकविसाव्या शतकात भारतासमोर अनेक आव्हाने आवासून उभी ठाकली आहेत.
आपण मंगळावर पोहोचण्याची किमया केली पण; ज्या इंग्रजांनी आपल्याला मूर्ख बनवून जातिवाद आपल्यात पेरला व संपूर्ण भारतात लुटून नेला त्याच जातीवादाला आपण चिकटून राहिलो आहोत, ही गोष्ट लाज वाटण्यासारखी आहे. आत्यंतिक धर्मवाद, जातिवाद यामुळे माणसा माणसांमध्ये मोठी दरी तयार होत आहे. कधी आपण सर्वजण त्या खोल दरीत बुडून जाऊ ते आपल्याला सुद्धा कळणार नाही. ज्या पद्धतीने आपण औद्योगिक शैक्षणिक प्रगती केली त्या पद्धतीने आपली मानसिक प्रगती काय होऊ शकली नाही. ज्या बुद्ध- महावीरांनी, संत ज्ञानदेव -तुकारामांनी मानवतेचा अनमोल संदेश, आपल्या भूमीमध्ये जन्माला येऊन आपल्या लोकांना दिला, त्याच भूमीमध्ये धर्माच्या नावावर क्रूरतेने हत्या होते हे भारतभूमीला शोभणारे नाही. त्याचप्रमाणे प्रशासनात बोकाळत चाललेला भ्रष्टाचार हे सगळ्यात मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. हे असेच चालू राहिले तर आपला भारत देश श्रीलंका, पाकिस्तान व्हायला वेळ नाही लागणार. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बेरोजगारी भारतामध्ये दरवर्षी 70 टक्के पदवीधरांना नोकरी मिळत नाही, त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. या तरुणांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून आपणच रोजगाराच्या संधी आपणच निर्माण केल्या पाहिजेत व आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करत भारताला महासत्ता बनविण्यामध्ये आपले योगदान दिले पाहिजे. जाता जाता एवढंच सांगतो ज्याप्रमाणे 1947सालि सर्व जणमाणसांनी क्रांती करून नवभारताचे स्वप्न बघितले, त्याचप्रमाणे या भारत मातीशी प्रामाणिक व एकनिष्ठ राहून ही सुद्धा आव्हाने पार करून या सुवर्ण भारताचे जगाचे नेतृत्व हाती घ्यावे हीच इच्छा व्यक्त करतो.
खूब बहती है अमन की गंगा बहने दो
मत पहलाओ देश मे दंगा रहने दो
लाल- हरे रंग मे ना बाटो हमको
मेरे छत पर एक तिरंगा रहने दो