राजमाता जिजाऊ जयंती 10 ओळींचे मराठी भाषण speech on jijau jayanti
सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्रमुख पाहुणे तसेच माझे गुरुजन वर्ग व माझे वर्गमित्र आणि मैत्रिणींनो.
आज 12 जानेवारी म्हणजे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंची जयंती होय.
राजमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील सिनखेडराजा या गावी झाला.
राजमाता जिजाऊ या लहानपणीपासूनच शूरवीर होत्या.
राजमाता जिजाऊंचा अगदी लहान वयातच शहाजीराजे भोसले यांच्याशी विवाह झाला.
राजमाता जिजाऊ यांचा पुत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय.
छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची प्रेरणा ही महासाहेबांकडून मिळाली होती.
राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांवर चांगले संस्कार केले त्याचबरोबर त्यांना तलवारबाजी घोडेस्वारी करणे लढाया करणे कमी करण्याचे तंत्र इत्यादी गोष्टी मा साहेबांनी शिकवल्या.
समाजकारणाबरोबरच राजकारणाचे धडे देखील मासाहेबांनी शिवाजी महाराजांना दिले.
छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेत असताना राजमाता जिजाऊंनी स्वतः राज्यकारभार चालवला.
मासाहेबांच्या अग्नी वरून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली.