भीमजयंती तडफदार भाषण 2024 speech on bhimjayanti
आज 14 एप्रिल म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती होईल या जयंतीनिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत आणि या ठिकाणी भाषण करण्याची मला संधी मिळत आहे .
सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष प्रमुख पाहुणे तसेच माझे गुरुजन वर्ग व माझ्या बाल मित्रांनो आज मी तुम्हाला महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी छोटेसे भाषण सांगणार आहे त्यांचे विचार या ठिकाणी मांडणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्याल ही नम्र विनंती.
भारतरत्न डॉक्टर बबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण साजरी करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 891 रोजी मध्य प्रदेशातील महू या ठिकाणी झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आंबेडकर होते.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणीपासूनच खूप कुशाग्र बुद्धिमत्तेचे ज्ञानी तत्वज्ञ व्यक्तिमत्त्वाचे होते.
त्यांचे बालपणीचे शिक्षण हे महाराष्ट्रामध्येच झाले व उच्च शिक्षणासाठी त्यांना परदेशात जावे लागले प्रदेशातील सर्व खर्च शिष्यवृत्ती देण्याचे कार्य सयाजीराव गायकवाड महाराज व कोल्हापूर संस्थानचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांना शिष्यवृत्ती दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रदेशांमध्ये अनेक पदव्या मिळवल्या त्यामध्ये पीएचडी होती डिलीट एलएलबी अशा प्रकारच्या त्यांनी वेगवेगळ्या पदव्या मिळवल्या वरचे प्रदेशातून स्वदेशात आले येथे आल्याबरोबर त्यांनी वकिली व्यवसाय सुरू केला परंतु त्यांचे वकील या व्यवसायामध्ये मन रमत नव्हते त्यांना लहानपणापासूनच स्पृश्य अस्पृश्यता मनामध्ये होती
लहानपणापासूनच त्यांना अनेक प्रसंगांमधून दिन दलितांवर होणारे अत्याचार अन्याय त्यांनी जवळून पाहिले होते त्यामुळे त्यांचे मन नोकरीत किंवा व्यवसायात रमत नव्हते त्यांनी ठरवले की समाजामधून ज्या वाईट चालीरीती रूढी परंपरा आहेत त्या समोर नष्ट करायच्या दिन दलितांना त्यांचे हक्क अधिकार कर्तव्य मिळवून द्यायचे त्यांच्यासाठी लढाईचे संघर्ष करायचा व त्यांना न्याय मिळवून द्यायचा असे त्यांनी निश्चय केला.
त्यांनी समाजाला उद्देशून सांगितले आहे की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे व ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी समाजाला गुरु मंत्र दिला.
अतिशय कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी संघर्ष करून समाजाला न्याय मिळवून देण्याचे कार्य केले मग त्यामध्ये चवदार तळ्याचा सत्याग्रह असेल ज्या पानवट्यावर दिन दलितांना पाणी पिण्यासाठी परवानगी नव्हती त्या ठिकाणी त्यांनी सत्याग्रह केला काळाराम मंदिर नाशिक येथील काळाराम मंदिरामध्ये दिंनदलितांना उपेक्षितांना कामगारांना प्रवेश मिळत नव्हता तो त्यांनी मिळवून दिला त्या ठिकाणी देखील त्यांनी सत्याग्रह केला.
पुढे ते भारत सरकारमध्ये कायदामंत्री पदावर गेले त्यामधून देखील जनतेला त्यांनी न्याय मिळवून देण्याचे कार्य केले अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचे तत्त्वज्ञ असल्यामुळे त्यांना भारत सरकारने भारताचे संविधान बनवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते त्यांनी अहोरात्र महिन्यात करून भारताचे संविधान लिहिण्याचे कार्य केले व कायदा बनवण्याचे कार्य केले त्यामुळे त्यांनी गोरगरीब समाजाला दिन दलितांना न्याय देऊ शकले.
हा देखील आपला देश त्यांनी बनवलेल्या राज्यघटनेवर चालतो आपल्या देशाची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी राज्यघटना आहे ती लिहिण्याचे भाग्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मिळाले.
महापरिनिर्वाण
अशा या महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिनांक 6 डिसेंबर 1958 रोजी झाले या महामानवास माझे त्रिवार अभिवादन