भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मराठी छोटे भाषण speech on bhimjayanti

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मराठी छोटे भाषण speech on bhimjayanti

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती चे भाषण पाहणार आहोत सदर भाषण हे आपल्याला शालेय स्तरावर तसेच इतर कोणत्याही प्रसंगी करावयाचे झाल्यास जयंती पुण्यतिथी साठी अत्यंत उपयुक्त असे तडफदार सुंदर भाषण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले सामाजिक शैक्षणिक कार्य यावर आधारित भाषण आहे.

आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त थोडक्यात भाषण पाहणार आहोत भाषणामध्ये कोणकोणते मुद्दे घ्यायचे ते बघणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य व त्या कार्याचा लेखाजोखा संबंध इतिहास सदर भाषणातून आपणासमोर मांडण्याचा छोटासा प्रयत्न करत आहे.

सन्माननीय व्यासपीठ व व्यासपीठावरील विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व प्रमुख पाहुणे तसेच माझे गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो आज आपल्या शाळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण साजरी करत आहोत आणि त्यानिमित्त आज मी तुमच्यासमोर काही बाबासाहेबांचे विचार मांडणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्याल ही नम्रतेने विनंती करतो.

दिन दलितांचे कैवारी जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ राजनीती धुरंधर कायदे पंडित लेखक समाज सुधारक स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री भारतीय संविधानाचे जनक महामानव दिन दलितांचे कैवारी व दिन दलितांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या साखल दंडातून मुक्त करणारे तसेच समाजातील अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी ज्यांनी अहोरात्र प्रयत्न केले उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटवणारा महासौर्य तसेच स्वतःच्या अलौकिक बुद्धिमत्तेचा वापर समाजाच्या हितासाठी करणारे चंदनापरीस आपला जीव ज्यांनी जिजवला आपल्या बांधवांच्या उन्नतीसाठी अहोरात्र झटणारे समतेसाठी सत्याग्रह करणारे समता बंधुता मानवता या तत्त्वांचा स्वीकार करणारे भारताचे एक अमूल्य रत्न ज्यांना आपण महामानव म्हणतो अशा या महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचे वंदन करून मी माझ्या भाषणात सुरुवात करतो.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 891 मध्ये मध्य प्रदेशातील महू या गावी झाला त्यांच्या आईचे नाव भीमाबाई व वडिलांचे नाव रामजी हे होते. भीमराव रामजी आंबेडकर असे त्यांचे पूर्ण नाव होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासूनच अतिशय कुशाग्र बुद्धिमान तेजस्वी महत्त्वकांक्षी विचारसरणीचे होते त्यांना शालेय शिक्षण घेताना अस्पृश्य म्हणून मानहानीशी करावी लागली होती पण ते मुळीच त्यांना खजले नाहीत त्यांनी अस्पृश्यता दिली दलितांच्या उतारासाठी जीवनाची अंतिम ध्येय निश्चित केले.

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे चौथीची परीक्षा पास झाल्यावर त्यांना केळुस्कर गुरुजींनी लिहिलेले भगवान बुद्धाचे चरित्र हे पुस्तक वाचण्यास दिले पुस्तक वाचून भीमराव खूप प्रेरित झाले आणि त्यांनी आपल्या वडिलांना विचारले आम्हाला बौद्ध साहित्याचा परिचय वाचण्यास का दिला नाही फक्त रामायण महाभारत हेच ग्रंथ का वाचण्यास दिले त्यात शूद्र अस्पृश्यांनी नालास्ती केली आणि ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचा गौरव वडिलांनी भीमराव यांना सांगितले की आपण अस्पृश्य जमातीचे असल्यामुळे तुला नवीन गंड होण्याची शक्यता आहे आणि रामायण महाभारत ग्रंथ वाचनाने हा नेऊनगंड दूर होईल असे मला वाटले कर्ण द्रोण हे किती उंचीपर्यंत पोहोचले हे पाहण्या सारखे आहे तसेच वाल्मिकी हे कोळी असून रामायणाचा करता झाले.

वडिलांनी दिलेल्या या उत्तरामुळे बाबासाहेबांचे समाधान झाले नाही महाभारतातील एकही व्यक्ती बाबासाहेबांच्या मनाला भुरळ घालू शकला नाही आणि येथूनच बाबासाहेबांचा बुद्ध्यांकडील प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झालेला होता.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते जो प्राशन करेल तो बुरगुडल्याशिवाय राहणार नाही जे मस्त सुधारलेला असतं ते कुणापुढेही नतमस्तक होत नाही भीमरावांनी आपले उच्च शिक्षण बडोदा सरकारची शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून व इंग्लंड मधील विद्यापीठातून पूर्ण केले नंतर ते मायदेशी परतले त्यांनी आपल्या बांधवांना शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा गुरु मंत्र दिला गोरगरीब दिंडलित समाजाच्या न्याय व हक्कांसाठी अधिकारांसाठी अनेक त्यांनी आंदोलने व सत्याग्रह केले.

डॉक्टर बाबासाहेबांनी सामाजिक भेदभाव व उच्चपणा यांचे समर्थन करणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथाचे जाहीर रित्या दहन केले नाशिक मधील काळाराम मंदिरामध्ये दिन दलितांना प्रवेश मिळवून दिला त्यासाठी त्यांनी सत्याग्रहाचे अस्र उपासले महाडच्या चवदार तळ्यावर त्यांनी दिंडलितांना पाणी भरण्याचा हक्क मिळवून दिला समाजाने ढिकारलेल्यांसाठी ते आशचा किरण झाले. मूकनायक हे पाक्षिक व बहिष्कृत भारत हे साप्ताहिक तर समता हे वृत्तपत्र सुरू करून त्यांनी समाजप्रबोधनाचे बहुमूल्य कार्य केले श्री शिक्षणाचा सदैव त्यांनी पुरस्कार केला.

महापरिनिर्वाण दिन

अशा या महामानवाचा सहा डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले अशा या अष्टपैल्य व्यक्ती व्यक्तिमत्त्वाचा महामानव ज्ञान समाधी तपस्वी अमोल वक्तृत्वाचा धनी व कुशल नेतृत्वाचा समाज सुधारक युगप्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन

Leave a Comment