भारताची अवकाशपरी पहिली महिला अंतराळवीर कल्पना चावला जयंतीनमित्त मराठी भाषण speech on aironotics kalpana chawla 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारताची अवकाशपरी पहिली महिला अंतराळवीर कल्पना चावला जयंतीनमित्त मराठी भाषण speech on aironotics kalpana chawla 

कल्पनाचा जन्म १७ मार्च १९६२ चा. कल्पनाचे वडील एक व्यापारी व उद्योगपती होते. टागोर बालनिकेतनमध्ये तिचे शालेय शिक्षण झाले. गुणवत्ता, उत्तम मार्क्स यांच्या जोरावर इंजिनिअरिंग विशेषतः एरॉनॉटिक्स इंजिनिअरिंगला तिने प्रवेश घेण्याचे ठरवले.

एरॉनॉटिक्स या शाखेत प्रवेश मिळवणारी ती एकमेव मुलगी ठरली. त्या वेळी पंजाब इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सगळ्या मिळून तीन विद्यार्थिनी होत्या.

कल्पनाने आपली जिद्द पुरी करून दाखवली. तिने एरॉनॉटिक्स इंजिनिअरिंगचा डिग्री कोर्स नुसताच यशस्वी केला नाही तर विद्यापीठात पहिला क्रमांक मिळवून पंजाब विद्यापीठाचे सुवर्णपदक मिळवले.) त्यानंतर अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठात-एरॉनाटिक्समध्ये पुढील शिक्षण व संशोधनासाठी प्रवेश मिळवला.

१९८२ मध्ये एरोस्पेस इंजिनिअरिंगमधली मास्टर ऑफ सायन्स (MS) पदवी तिला टेक्सास विद्यापीठाकडून मिळाली. तर परत दुसरी मास्टर ऑफ सायन्स (MS) डिग्री मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये कोलॅराडो

विद्यापीठाकडून मिळाली. तिथेच तिने संशोधनकार्य पुढे चालू ठेवले. १९८८ मध्ये तिला एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये पीएच. डी. प्रदान करण्यात आली.

एरोस्पेस इंजिनिअरिंग व तंत्रज्ञान हा अतिशय गुंतागुंतीचा आणि अवघड विषय ! अवकाशात जाणाऱ्या वस्तू त्यावर होणाऱ्या प्रक्रिया, होणारे विविध परिणाम या बाबतीत तिने विशेष संशोधन केले. या तंत्रज्ञानात आमूलाग्र बदल होत आहेत. अंतराळ मोहिमांसाठी पुन्हा पुन्हा वापरता येतील अशी अवकाशयाने तयार करण्यासाठी लागणारी साधनसामुग्री (मटेरियल), वस्तू, त्यांचा दर्जा, वजन, टिकण्याची क्षमता, अतिउष्णतेचा, दाबाचा त्यावर होणारा परिणाम हाही तिच्या अभ्यासाचा विषय होता.

‘नासा’ ही अवकाश संशोधनातील सर्वोच्च संस्था ! प्रत्येक संशोधकाला तिथे काम करण्याची संधी मिळाली तर कृतकृत्य वाटते. कल्पनाच्या एरोस्पेस तंत्रज्ञानातील संशोधनाची नासाने दखल घेतली नसती तर नवलच! नासाच्या संशोधन विभागात काम करण्यासाठी तिची निवड करण्यात आली. ही नोकरी म्हणजे कल्पनेचा बहुमान होता.

तिथे तिला खूप गोष्टी शिकावयास मिळाल्या. निळ्याशार दिसणाऱ्या आकाशाच्या पलीकडे काय आहे हे जाणून घेण्याचे तिचे

बालस्वप्न आता प्रत्येक्षात अवतरणार असे दिसू लागले. तिच्या अपार परिश्रमांचे फळ मिळू लागले. सन १९९४ मध्ये अवकाशयात्रींसाठी चाचणी व निवड करण्याचे नासाने ठरविले.

कठोर चाचण्यांतन प्रशिक्षणासाठी फक्त पंधरा तंत्रज्ञांची निवड करण्यात आली. त्यातील एक होती कल्पना चावला.

कोलंबिया-STS-87 मोहिमेची जय्यत तयारी झाली. निळ्या आकाशापलीकडील कल्पनाचे हे पहिले उड्डाण. अत्यंत रोमांचकारी क्षण होते ते ! कोलंबिया यान अवकाशात झेपावले. उड्डाण यशस्वी झाल्याचा नियंत्रण कक्षाने सिग्नल दिला आणि सर्वत्र जल्लोष झाला.

पृथ्वीवर हे यान ५ डिसेंबर, १९९७ रोजी अलगदपणे उतरवण्यात कल्पना, तिचे सहकारी व नासातील शास्त्रज्ञ यशस्वी झाले.

कोलंबिया मिशन STS-107

कोलंबिया-२००३-१६ जानेवारी, २००३ या दिवशी पहाटे प्रक्षेपण करण्याचे निश्चित केले गेले. नियोजित वेळेवर अचूक प्रक्षेपण झाले. कोलंबिया २००३ यान अभिमानाने निळ्याशार अवकाशापलीकडे भ्रमण करू लागले. स्पेस हॅबीटंट -या सजीव परिवारावर कल्पना व तिचे सहकारी रोज रिपोर्ट पाठवित होते. तिने कळविले होते की, ‘आता ओलसर तृणधान्यांना कोंब फुटले आहेत. कोळी सुंदर जाळी बांधत आहेत. कोशातून रेशीमकीडा बाहेर पडला. माशांना पिल्ले झाली आणि हे सजीव जीवनचक्र अवकाशतही चालू राहात आहे! या संशोधनाचा पुढील अवकशमोहिमेत फार मोठा उपयोग होत आहे. नियोजनाप्रमाणे सर्व कार्य व्यवस्थित पार पडत होते.

पूर्वनियोजनानुसार कोलंबिया अवकाशयानाच्या परतीचा प्रवास शनिवार दि. १ फेब्रुवारी, २००३ रोजी सुरू झाला आणि दुर्दैवाने ते यान जळून नष्ट झाले. विदारक सत्य कल्पनासह सहाही अंतराळवीरांचा मृत्यू ! आसमंतात कायमची विसावली ….. कधीही परतून न येण्यासाठी ! .. कल्पना

तिच्या स्मृतिप्रित्यर्थ नासा व भारत सरकारतर्फे कर्नाळच्या दोन हुशार विद्यार्थिनींना दर दोन वर्षांनी नासाची शैक्षणिक सफर घडवून आणली जात आहे.

 

Join Now