काही लोकांच्या जीवनात त्यांनी बरीच दुःख भोगलेली असतात त्यामुळे ती शांत झालेली असतात some people silent cause
काही लोकांच्या जीवनात त्यांनी बरीच दुःख भोगलेली असतात त्यामुळे ती शांत झालेली असतात
त्यांना आता एकांत प्रिय वाटायला लागत असतो. माणसाची गर्दी अवतीभोवती नकोशी वाटते.
एकटेपणातच खूश राहायला शिकलेली असतात .
आता ती एकटी एकांतप्रिय उगच झालेली नसतात.
तर बरेच अनुभव लोकांकडून घेऊन ती एकांतप्रिय झालेली असतात, एकटपणा कुणालाच आवडत नाही. एकांतप्रिय झालेली माणसांना ही माणसाच्या गर्दीत मनभरून जगायचं असतं जीवनाचा आनंद त्यांनाही घ्यायचा असतो.
पण एवढे वाईट अनुभव लोकांकडून त्यांना भेटलेले असताता कि आता त्यांना एकांतच प्रिय वाटू लागलेला असतो.
उगच कुणी एकटा होत नाही. बरीच चांगूलपणाची शिक्षा त्याला भेटलेली असते. चांगूलपणाचा त्याच्या बराच फायदा घेतलेला असतो.
गरज असते त्यावेळी बऱ्याच वेळी रिकाम्या हाताने त्याला पाठवलेला असतो.
मदत हवी असते.
तेव्हा कोणीच उपयोगी आलेलं नसंत सावरासावर करून रिकाम्या हातानी माघारी पाठवलेल असंत प्रेम हव असतं तेव्हा ते मिळालेलं नसतं ना त्याचे प्रेम कोणी समजून घेतलेलं असतं त्याच्या चांगूलपणाचा प्रामाणिक राहण्याचा केवळ फायदा करून घेतलेला असतो.
हे सगळ त्याने डोळ्याने टिपलेल असतं त्यातूनच तो माणसाच्या गर्दीतून बाहेर पडून एकांतप्रिय झालेला असतो.
एकांतप्रिय झालेला माणूस मात्र खूप समजदार झालेला असतो.
त्याने बरेच अनूभव जीवनात घेतलेले असताना त्याला खूप समजदारणा आलेला असतो.
तो एकांतात राहत असला तरी तो लोकांना दुःखात पाहू शकत नाही.
त्याची कोणी मदत केलेली नसली तरी तो इतरांना मदत करायला तत्पर असतो.
कारण मदत न मिळाल्याचे दुःख त्याला माहित असतं.
तो इतरांना प्रेम द्यायला नेहमीच तयार असतो.
कारण त्याला जीवनात प्रेम न मिळालेलं दुःख माहित असतं तो प्रत्येकाच्या गरजेला उभा राहतो.
कारण त्याच्या गरजेवळी कोणी धावलेलं नसत त्याचं दुःख त्याला माहित असते.
त्यामुळे जे त्याला मिळालेल नसतं ते तो दुपट्टीने इतरांना देत असतो.
फक्त आता त्याला जवळकी आणि माणसाची गर्दी नको असते.
एकांतात राहून बरेच ज्ञान समजदारपणा त्याने शिकलेला असतो.
त्यामुळे आता तो स्वता शांत राहून इतरांना समजून घेण्यात प्रेम देण्यात सुख मानतो..