०८ जागतिक महिला दिन छोटे मराठी भाषण small speech on women’s day
ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊ चा शिवबा झाला .
ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताई चा ज्ञानदेव
झाला ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम .
झाला आणि त्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला.
प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा असतो अशा या स्त्री शक्तीला प्रथमतः मानाचा मुजरा
small speech on women’s day आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष प्रमुख पाहुणे आणि माझे गुरुजन वर्ग आणि माझ्या जमलेल्या बालमित्र आणि मैत्रिणींनो आज मी तुम्हाला जागतिक महिला दिना विषयी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्याल ही नम्र विनंती.
छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यामागील खरी प्रेरणा होती ती राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंचे
स्वातंत्र्याची चेतना देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई आणि श्री शिक्षणासाठी झटणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सर्व स्त्रियांच्या कार्याला प्रथमतः वंदन करून मी माझ्या छोट्याशा भाषणाला सुरुवात करतो.
आठ मार्च म्हणजे जागतिक महिला दिन होय ८ मार्च रोजी सर्वत्र जगभरात महिला दिन साजरा केला जात असतो आजचा दिवस प्रत्येक महिलेसाठी मानाचा सन्मानाचा अभिमानाचा आदराचा दिवस होय आणि तो असणारच कारण आज अनेक ठिकाणी कर्तृत्ववान महिलांचे सत्कार सन्मान केला जातो पुरस्कार दिले जातात महिलांच्या कार्याची दखल घेत सन्मानाने त्यांना प्रोत्साहन दिले जाते असा हा महिला दिन दरवर्षी आनंदात आणि उत्साहांमध्ये आपण साजरा करत असतो.
small speech on women’s day इतिहासाची पाने जर चाळली तर मार्च 1908 रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो श्री कामगारांनी रूट गर्ल्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता या मागण्या केल्या.
1910 स*** कोपन हेगण येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत मार्च 1908 रोजी अमेरिकेतील श्री कामगारांनी केलेले आतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून स्वीकारावा असा ठराव कलारा झेटकिन यांनी मांडला तो पास झाला आणि तेव्हापासून मार्च या दिवशी जागतिक महिला दिन साजरा करण्यात येऊ लागला.
small speech on women’s day आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे सर्वात मोठे उद्दिष्ट म्हणजे महिला आणि पुरुषांमध्ये समानता निर्माण करण्यासाठी जागरूकता आणणे तसेच महिलांना त्यांच्या हक्काविषयी जागृत करणे आहे महिलांचे हक्क आणि कर्तव्य त्यांना समजावून देणे हा देखील या मागचा उद्देश आहे.
आज 21 व्या शतकामध्ये जगामध्ये पुरुषांबरोबर श्रीया देखील सर्वत्र क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावताना दिसत आहेत परंतु आज देखील श्री सुरक्षित नाही हे खेदाने बोलावेच लागते कारण स्त्रियांसमोर अनेक समस्या आहेत ज्या की लैंगिक शोषण असेल अत्याचार असेल हुंडाबळी असेल म्हणून हत्या या गोष्टीमुळे स्त्रियांच्या मुलींच्या मनात भीतीची असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे मुलीचा जन्म झाल्यावर तिचा तिरस्कार केला जातो स्त्रियांचा अपमान केला जातो स्त्री पुरुष समानता ही आचरणात आणायला हवी.
पूर्वीच्या काळी देखील स्त्रियांना शिकू दिले जात नसायचे स्त्रियांना शिक्षण म्हणजे पाप समजले जायचे अशा परिस्थितीमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे उघडी केली स्वतः शिक्षिका बनल्या पहिल्या मुख्याध्यापका पहिल्या शिक्षिका म्हणून त्यांनी अध्ययन अध्यापनाचे कार्य चालू ठेवले गोरगरीब समाजातील बहुजन समाजातील मुला मुलींना शिक्षणाची दारे कायमची उघडी करून दिली अशा या महान माऊलीला माझा माझे विनम्र अभिवादन
आज भारतामध्ये स्त्रियांच्या बाबतीत विचार केला तर श्रिया अधिक सक्षम बनलेले आहेत पुरुषांच्याही पुढे श्रिया गेल्याचे दिसत आहे महिला सबलीकरणासाठी केंद्र सरकार विविध प्रकारचे उपक्रम राबवत आहे या उपक्रमांच्या माध्यमातून स्त्रिया सक्षमीकरण केले जात आहे बचत गटाच्या माध्यमातून अनेक स्त्रियांना रोजगार संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. स्त्रियांच्या हाताला काम मिळाल्यामुळे स्त्रिया स्वालंबी झालेले आहेत स्वतःचे निर्णय त्या स्वतः घेत आहेत
आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया अग्रेसर आहेत आज भारताच्या महामहीम पण राष्ट्रपती एक महिला आहेत ही स्त्रियांसाठी खूप अभिमानाची बाजू आहे श्रिया आज आयएएस आयपीएस सचिव पदावर देखील आहेत तसेच अनेक राज्यांच्या मुख्यमंत्री देखील स्त्रीया आहेत त्यामुळे स्त्रिया आता खऱ्या अर्थाने स्वतःच्या पायावर उभे आहेत
जाता जाता मी एवढे म्हणेन
तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार
तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार
लक्षदिव्यांनी उजळू दे तुझा संसार कर्तुत्व आणि
सामर्थ्याची ओढून ये नवी झालर
श्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर श्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा सागर