शिक्षक, मुख्याध्यापक कर्मचाऱ्यांचा स्टार प्रकल्पांतर्गत आंतरराष्ट्रीय स्तरावरील सिंगापूर येथे अभ्यास दौरा singapure study daura
स्टार प्रकल्पांतर्गत आंतरराष्ट्रीय स्तरावरील सिंगापूर येथे अभ्यास दौरा करण्यारिता प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात येत आहे
:-प्रस्तावना :-
स्टार प्रकल्पातंर्गत SIG ३ मधील ३.२ अंतर्गत देशातंर्गत व देशाबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी प्रती व्यक्ती २.०० लक्ष याप्रमाणे १५० व्यक्तीकरीता रु.३००.०० लक्ष तरतूद मंजूर आहे. त्यामुळे देशातंर्गत व देशाबाहेर अभ्यास दौऱ्याचे नियोजन विचाराधीन होते. या विदेश दौऱ्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णयः-
स्टार प्रकल्पातंर्गत SIG ३ मधील ३.२ (m) Exploring Global Horizons: Knowledge Sharing on National and International Platforms या लेखाशिर्षात देशातंर्गत व देशाबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी प्रती व्यक्ती २.०० लक्ष याप्रमाणे १५० व्यक्तीकरीता रु.३००.०० लक्ष तरतूद मंजूर आहे. त्यामुळे देशातंर्गत व देशाबाहेर अभ्यास दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे.
२. त्यानुषंगाने इतर देशात म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षण क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या वैविध्यपूर्ण, नाविन्यपूर्ण उपक्रमांची / योजनांची माहिती जाणून घेऊन या उपक्रमांची आपल्या राज्यात अंमलबजावणी करण्याची शक्यता पडताळणी करण्याच्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र राज्यातील ५० अधिकारी (समन्वयक), मुख्याध्यापक, शिक्षक यांना सिंगापूर येथे आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यास नेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सदर अधिकारी / कर्मचारी यांची यादी पुढीलप्रमाणे आहे.
२. सदर सिंगापूर अभ्यास दौऱ्यास परराष्ट्र मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या क्रमांक EPC १३०३२५१०९९३१SG, दि. १८.०३.२०२५ अन्वये मंजूरी प्राप्त आहे.
३. सदर अभ्यास दौरा व शाळांना भेटी या कालावधीत सर्व अधिकारी / कर्मचारी यांचा संपूर्ण खर्च शालेय शिक्षण विभागांतर्गत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदे मार्फत स्टार्स (STARS) प्रकल्पांतर्गत SIG ३.२ अंतर्गत तरतूदीतून करण्यात येणार आहे.
४. उपरोक्त सिंगापूर दौऱ्यात सहभागी असलेल्या ५० अधिकारी / कर्मचारी यांचा सदरील दौऱ्याचा संपूर्ण कालावधी प्रवासाच्या कालावधीसह कर्तव्य कालावधी म्हणून समजण्यात यावा.
५. या प्रकरणी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी सदर अधिकारी / कर्मचारी यांचा वैद्यकीय विमा काढावा. तसेच कोविड सारखी संसर्गजन्य आजाराची परिस्थिती उद्भवल्यास योग्य ते वैद्यकीय उपचार मिळतील याची दक्षता घ्यावी.
६. सदर विदेश दौरा पूर्ण झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या विदेश दौऱ्यासंबंधीचा विस्तृत अहवाल प्रशासकीय विभागास तसेच सामान्य प्रशासन विभागास सादर करावा. तसेच विदेश दौऱ्यात प्राप्त केलेल्या ज्ञानाचा/कौशल्याचा उपयोग अन्य अधिकारी / कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यासाठी करावा.
७. सदर शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने ई-नस्ती क्र. १०१२३०७/२०२५ अन्वये दिलेल्या शिफारस समितीच्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.
८. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०३१९१२४९०२९८२१ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,