इ.5वी ते 8वी विद्यार्थ्यांची अंतरिक्ष केंद्र श्रीहरिकोटा,स्पेस म्युझियम शैक्षणिक सहल आयोजित करणेबाबत shriharikotta educational trip ayojan
जिल्हा परिषद अंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम महादीप” अंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांतील इ. 5 वी ते 8 गुणवंत विद्यार्थ्यांची अंतरिक्ष केंद्र श्रीहरिकोटा, आंध्रप्रदेश येथे उपग्रह प्रक्षेपणाचा प्रत्यक्ष अनुभव, सुंबा येथील स्पेस म्युझियम. विश्वेश्वरय्या इंडस्ट्रियल अॅण्ड टेक्नीकल म्युझियमचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी शैक्षणिक सहल आयोजित करणेबाबत.
वरील संदर्भिय पत्रान्वये आपणास कळविण्यात येते की, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, संशोधन वृत्तीचा विकास व्हावा, विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञांच्या कार्यपध्दतीची जवळून ओळख व्हावी, शास्त्रज्ञ निर्मितीस हातभार लागावा, विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील संशोधन प्रक्रियेची माहिती मिळावी, या हेतूने अंतरिक्ष केंद्र श्रीहरिकोटा, आंध्रप्रदेश येथे गुणवत्ता पूर्ण शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल आयोजित केल्यास फायदा होईल अशा सूचना बैठकीमध्ये दिलेल्या आहेत. या दृष्टिने जिल्हा परिषद शाळांमधील इ. 5 वी ते 8 वी वर्गात शिकणा-या विद्यार्थ्यांची निवड चाचणीच्या माध्यमातून निवड करुन शैक्षणिक सहल आयोजित करावी अशा सुचना आहेत.
सदरील विद्यार्थ्यांची निवड कशा पध्दतीने कराची या बाबत विस्तृत सुचना पत्रामध्ये देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार सहलीसाठी निवडावयाच्या एकूण 40 विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया खालील प्रमाणे करण्याबाबतचे नियोजन करण्यात येत आहे.
shriharikotta educational trip ayojan महादीप या उपक्रमांतर्गत इयत्ता 5 वी ते 8 वी च्या अभ्यासक्रमावर आधारित मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्र, सामान्य ज्ञान इ. विषयांवर आधारित प्रश्नपत्रिका निर्मिती करण्यात येणार आहे, ज्या ज्या महिन्यात चाचणी घेण्यात येईल त्या महिन्यापर्यंतचा दिलेल्या विषयाच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जातील. यामध्ये प्रथम भाषा १० प्रश्न व १० गुण, इंग्रजी १० प्रश्न व १० गुण, गणित १० प्रश्न व १० गुण, विज्ञान १० प्रश्न व १० गुण व सामाजिक शास्त्र व सामान्य ज्ञान संयुक्त १० प्रश्न व १० गुण याप्रमाणे एकूण ५० प्रश्न व ५० गुणांची चाचणी असेल,
1. शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळेल, असे नियोजन करावे.
2. सदर चाचणी ही शाळा, केंद्रशाळास्तर, तालुकास्तर, व जिल्हा स्तरावर आयोजित करण्यात येत आहे.
4. परीक्षेस १० मिनिटांचा अवधी राहील.
5. या परीक्षेतुन सर्वोत्तम गुणवत्ता धारक इ. ५ वी ते ८ वी च्या प्रत्येकी २ विद्यार्थ्यांची केंद्रस्तरीय चाचणीसाठी निवड करण्यात यावी
केंद्रशाळा स्तरीय निवड चाचणी-
1. सदरची निवड चाचणी केंद्रस्तरावर नोव्हेंबर च्या शेवटच्या आतयक्रमात किया जिरोबरच्या पहिल्या आठवळ्यात आयोजित करण्यात येईल. निश्चित तारीख नंतर कळविण्यात येईल.
2. केंद्रांतर्गत शाळांमधून निवडलेल्या प्रत्ति वर्ग 2 या प्रमाणे प्रति शाळा 8 विद्याथ्यर्थी या चाचणीत
सहभागी होतील.
3. बाचणीकरिता वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची 50 प्रक्त असलेली 50 गुणांची प्रश्नपत्रिका तयार करण्यात येणार आहे.
4. चाचणीसाठी 90 मिनिटांचा अवधी राहील,
5. या निवड चाचणीतून सर्वोक्लम गुणवत्ता धारक प्रति वर्ग 3 विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात यावी,
केंद्रशाळा स्तरीय चाचणी पेपर तपासाणी समिती.
1. गटशिक्षणाधिकारी यांनी संबंधित केंद्रप्रमुखांच्या मदतीने संबंचित केंद्रातील सर्वोत्कृष्ट 5 शिक्षकांची पेपर तपासणीस्तव निमड करावी.
2. या शिक्षकांनी निकाल तयार करून केंद्रप्रमुखांकडे सुपूर्द करावा व केंद्रप्रमुखांनी केंद्रातील सर्वोतम गुणवत्ताधारक वर्ग निहाय ३ या प्रमाणे एकूण 12 विद्यार्थ्यांची नाचे गटशिक्षणाधिकारी यांना कळयानी,
तालुकास्तरीय निवड चाचणी-
1. सदरची चाचणी तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी यांचे संनियंत्रणाखाली माहे डिसेंबर 2024 च्या शेवटच्या साठवख्यात आयोजित करण्यात येईल.
2. केंद्रस्तरावरील चाचणीत सर्वोत्तम गुणवत्ता धारण करणारे प्रत्येक केंद्रातुन 12 या प्रमाणात विद्यार्थी तालुकास्तरावरील बाचणीत सहभागी होतील.
3. तालुकास्तरावर विद्यार्थी निवडीसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची ७० प्रश्न असलेली 50 गुणांची प्रश्नपत्रिका तयार करण्यात येणार आहे,
4. चाचणीसाठी 90 मिनिटांचा अवधी राहील.
5. या चाचणीतून तालुक्यातील सर्वोत्तम गुणवत्ता धारक वर्गनिहाय प्रति वर्ग 5 असे एकूण 20 विद्याथ्यांची जिल्हास्तरीय परीक्षेसाठी निवड करण्यात यावी,
तालुकास्तरीय चाचणी पेपर तपासणी समिती.
1. गटशिक्षणाधिकारी यांनी पेपर तपासणीस्तय तालुक्यातील विषय निहाय सर्वोत्कृष्ट 5 शिक्षकांची निवड करावी,
2. संबंधित शिक्षकांच्या मदतीने गटशिक्षणाधिकारी यांनी तालुकास्तरावर सर्वोत्कृष्ठ गुणवत्ता संपादन करणारे 20 विद्याथी निवडावे व त्यांची वर्गनिहाय यादी शिक्षणाधिकारी प्रा. यांना जिल्हास्तरीय चाचणीसाठी सुपुर्व करावी.
जिल्हास्तरीय निवड चाचणी
1. सदरची चाचणी जिल्हास्तरावर माहे जानेवारी 2025 च्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्यात येईल..
2. तालुकास्तरावरील चाचणीत सर्वोत्तम गुणवत्ता धारण करणारे प्रत्येक तालुक्यातील 20 या प्रमाणात विद्यार्थी या बाचणीत सहभागी होतील,
3. जिल्हास्तरीय चाचणीसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची 50 प्रश्न असलेली 50 गुणांची परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. या प्रमाणे एकूण 100 गुणांची परीक्षा होईल.
4. लेखी परीक्षेस २० मिनिटांचा अवधी असेल,
5. या परीक्षेतून सर्वोत्तम गुणवता धारण करणारे इ. ५ वी ते ८ वी वर्गनिहाय प्रत्येकी 10 विद्यार्थी या प्रमाणे एकूण 40 विद्यार्थ्यांची निवड शैक्षणिक सहलीसाठी करण्यात येईल.
6. सहलीकरिता निवड केलेल्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करुन घ्यावी. तसेच सहलीकरिता जाणा-या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांचे ना-हरकत प्रमाणपत्र घेण्यात यावे.
वरील सुचनांचे अधिन राहून सहलीसाठी एकूण 40 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. सहलीसंदर्भात इतर सुचना यथावकाश कळविण्यात येतील. सहलीचा संभाव्य कालावधी जानेवारी 2025 चा शेवटचा आठवडा किंवा फेब्रुवारी 2025 च्या पहिला आठवड्यात असेल.