शिवजयंती निमित्त १०० जबरदस्त मराठी/हिंदी चारोळ्या भाषणाला नेहमी टाळ्या मिळवून देणाऱ्या चारोळ्या shivjayanti marathi hindi charolya 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिवजयंती निमित्त १०० जबरदस्त मराठी/हिंदी चारोळ्या भाषणाला नेहमी टाळ्या मिळवून देणाऱ्या चारोळ्या shivjayanti marathi hindi charolya 

विजेसारखी तलवार चालवुन गेला,

निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,

वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा फाडून गेला,

स्वर्गात गेल्यावर ज्याला देवांनी झुकून मुजरा केला,

असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला

असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला.

एक होते शिवाजी, भिती नव्हती त्यांना जगाची

चिंता नव्हती परिणामांची

कारण त्यांना साथ होती मावळ्यांची

आणि शिकवण होती जिजाऊची

त्यांची जात होती मर्द मराठ्यांची

देशात लाट आणली भगव्या झेंड्याची

आणि मुहुर्तमेढ रोवली स्वराज्याची

म्हणुनच म्हणतात जय जिजाऊ, जय शिवाजी.

जिथे शिवभक्त उभे राहतात

तिथे बंद पडते भल्या-भल्यांची मती

जिथे शिवभक्त उभे राहतात

तिथे बंद पडते भल्या-भल्यांची मती

अरे मरण्याची कुणाला भिती

आदर्श आमचे राजे शिवछत्रपती

आदर्श आमचे राजे शिवछत्रपती.

शिवराय सांगायला सोपे आहेत,

शिवराय ऐकायला सोपे आहेत,

शिवरायांचा जयघोष करणे सुद्धा सोपे आहे,

पण शिवराय अंगीकारणे खूप कठीण आहे..

आणि जो शिवरायांना स्वतःच्या आचरणात आणेल,

तो या जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की.

सागराचे पाणी कधी आटणार नाही

स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही

हा जन्म काय, हजार जन्म झाले तरी

नाद “शिवरायांचा” सुटणार नाही

“ॐ” बोलल्याने मनाला शांती मिळते.

“साई” बोलल्याने मनाला शक्ती मिळते.

“राम” बोलल्याने पाप मुक्ती मिळते.

“जय शिवराय” बोलल्याने आम्हाला

शंभर वाघाची ताकद मिळते.

सुर्यनारायण जर उगवले नसते

तर आकाशाचा रंगच समजला नसता

आणि जर का शिवाजी महाराज जन्मले नसते

तर स्वातंत्र्याचा अर्थच कळाला नसता

जर का शिवाजी महाराज जन्मले नसते

तर स्वातंत्र्याचा अर्थच कळाला नसता.

हिंदू धर्म राखिले…. स्वराज्य स्वप्न साकारिले, गर्जुनिया केलासी स्वराज्य साजर…. छत्रपती शिवराया तूज मानाचा मुजरा …!!

भगवा आमचा झेंडा…. भगवे आमचे रक्त !

प्राण देऊनी राखितो…. आम्ही स्वराज्याचे तख्त !

सळसळत राहू दे…. मर्द मराठ्यांचे रक्त !

आम्ही फक्त नि फक्त शिवरायांचे भक्त !!

शिवराय सांगायला सोपे आहेत,

शिवराय ऐकायला सोपे आहेत,

शिवरायांचा जयघोष करणे सुद्धा सोपे आहे,

पण शिवराय अंगीकारणे खूप कठीण आहे..

आणि जो शिवरायांना स्वतःच्या आचरणात आणेल,

तो या जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की.

निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू । अखंड स्थितीचा निर्धारू । ॥ श्रीमंतयोगी ॥

शिवाजी या नावाला कधी उलट वाचलं आहे का ?

जीवाशी असा शब्द तयार होतो.

जो आयुष्यभर जीवाशी खेळले ते शिवाजी !

ज्यांच्या स्पर्शाने पवित्र झाली ही माती

ज्यांच्या नावाने फुगते गर्वाने आमची छाती

आमचं दैवत” राजा शिवछत्रपती “

मराठीशी नातं एक अतूट धागा

आमचं काळीज म्हणजे शिवरायांची जागा

चंद्रकोर शोभते मावळ्यांच्या माथ्यावर

शिवभक्तांचे मस्तक टेकते शिवरायांच्या पायावर !

ज्यांचं ज्यांचं मस्तक इथे नतमस्तक झालंय ना त्या मस्तकाला दुसऱ्या कोणासमोर नतमस्तक होण्याची गरजच भासत नाही

माता ज्याची थोर जिजाऊ शहाजी ज्याचे पिता..

तो लढला ज्यासाठी जन्मभरती होती मराठी अस्मिता

हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी तो संतापून पेटून उठला..

जो किल्ला त्याने चढला.. तेथे भगवा नेहमीच.. फडफडला

तरुणांच्या हाती देऊनी समशेर घडविला त्याने मावळा

स्वराज्यासाठी त्या शूरविरांनी सोसल्या लाखो कळा

छ:- छत्तीस हत्तीचे बळ असणारे,

त्र :- त्रस्त मोगलांना करणारे,

प :- परत न फिरणारे,

ति :- तिन्ही जगात जाणणारे,

शि :- शिस्तप्रिय,

वा :- वाणिज तेज,

जी :- जीजाऊचे पुत्र,

म :- महाराष्ट्राची शान,

हा :- हार न मानणारे,

रा :- राज्याचे हितचिंतक,

ज :- जनतेचा राजा,

सिंहाची चाल, गरुडा ची नजर, स्रीयांचा आदर,

शत्रूचे मर्दन, असेच असावे मवाळ्यांचे वर्तन,

हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण…..

जगणारे ते मावळे होते.. जगवणारा तो महाराष्ट्र होता..

पण स्वतःच्या कुटुंबाला विसरुन जनतेवर मायेने हात

फिरवणारा ‘आपला शिवबा’ होता..

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!

ज्यांच्या शौर्याची गाथा ऐकून अभिमानाने भरून जाई छाती प्रत्येक शिवभक्तांच्या मनामनात वसतात राजे शिवछत्रपती शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा !

साथ भगव्याची कधी सोडनार नाही

वचन भगव्याचे कधी मोडनार नाही

घेतला तो अखेरचा श्वास होईल हा काळही स्तब्ध ना पर्वा शत्रूची ना असे पराभवाची खंत आम्ही आहोत फक्त शिवशंभुचे भक्त.

जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

सगळं जवळ असून मोगल हारत होते

आणि काहीच जवळ नसताना मराठे जिंकत होते.

याचं कारण म्हणजे मोगल लढत होते

महिन्याच्या पगारासाठी आणि मराठे लढत होते स्वराज्यासाठी

स्वतःच्या मनगाटावर विश्वास असणाऱ्यांना

दुसर्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही.

आणि आशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस

नियती सुध्दा करत नाही

मित्र जोडावे शिवाजी महाराजांसारखे ज्यांच्या साथीने जग जिंकता येईल मैत्री टिकवावी शंभुराजांसारखी ज्यांच्यासोबत मरतांना भागीदारी करता येईल.

कोटी देवीदेवतांची अब्जावधी मंदिरे असूनही एकही मंदिर नसून जे अब्जावधींच्या हृदयावर अधिराज्य करतात त्यांना “छत्रपती शिवाजी महाराज” म्हणतात जय जिजाऊ जय शिवराय

तलवार तर सगळ्याच्या हातात होत्या,

ताकत तर सगळ्यांच्या मनगटात होती,

पण स्वराज्य स्थापनेची ईच्छा फक्त….

कोटी देवीदेवतांची अब्जावधी मंदिरे असूनही एकही मंदिर नसून जे अब्जावधींच्या हृदयावर अधिराज्य करतात त्यांना “छत्रपती शिवाजी महाराज” म्हणतात जय जिजाऊ जय शिवराय

जगातल्या सर्व ‘राजां’ च्या एका हातात ‘ढाल’ आणि एका हातात’तलवार’ आहे… पण… छत्रपतीशिवराय” आणि ” संभाजीराजे” हे जगातले दोनच “राजे” आहेत त्यांच्या पाठीवर ढाल आहे…

कारण

त्यांना 350 वर्ष अगोदर सुद्धाही माहित होत, पाठीवरच वार करणारे पैदा होतील छातीवर वार करणारे जन्माला येणार नाहीत….

निधड्या छातीचा, दनगड कणांचा, मराठी मनांचा, भारत भूमीचा एकच राजा, छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती जन्मोत्सवाच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा

स्वराज मिळवुन देण्यासाठी तो रात्रंदिवस झुरला… जनतेच्या अंधारी दुनियेत तो एकटाच सुर्य ठरला… अरे गर्वाने देतो आम्ही त्याला देवाची जागा कारण एका मराठ्याचा मुलगा अवघ्या 33 कोटींना पुरला….. जय शिवराय… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

राजाधीराज छत्रपती शिवराय दुर्गपती गजअश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नंश्रीपती अष्टावधानजागृत अष्टप्रधान वेष्टीत न्यायालंकार मंडीत शस्त्रास्त्रशांस्त्र पारंगत राजनीती धुरंधर पौढप्रताप पुरंदर क्षत्रीयकुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत. श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय.

श्वासात रोखूनी वादळ, डोळ्यांत रोखली आग, देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

छत्रपति शिवराय… शिवनेरीच्या क्षितिजावर उगवलेला, शेकडो वर्षाची काळरात्र चिरून स्वराज्याच्या मंगल प्रकाशाने सगळा आसमंत तेजोमय बनवणारा “शिवसुर्य ” जय शिवराय शिवजयंतीच्या शुभेच्छा

इतिहासाच्या पानावर,रयतेच्या मनावर,

मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर,

राज्य करणारा राजा म्हणजे,राजा शिवछत्रपती..।

भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता

झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता

कोणी चुकत असेल तर, त्याला सत्याची वाट दाखवा

आणि कोणी नडला तर, त्याला मराठयाची जात दाखवा

जय भवानी जय शिवाजी शिवजयंतीच्या शुभेच्छा !

जगातील एकमेव राजा असा आहे,

ज्याने स्वतःसाठी एकही,

राजवाडा महल नाही बांधला,

तो राजा म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज, 

माँ ने चलना सिखाया पिता ने मुझे बोलना सिखाया और शिवाजी महाराज ने हमें जीना सिखाया।

जय शिवराय शिवजयंती की हार्दिक शुभकामनाएं!

ज्यांच्या शौर्याची गाथा ऐकून अभिमानाने भरून जाई छाती प्रत्येक शिवभक्तांच्या मनामनात वसतात राजे शिवछत्रपती

शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा !

कोई खंड नहीं था, कोई कानून नहीं था फिर भी खुश लोग क्योंकि वह सिंहासन पर था मेरे छत्रपतिशिवाजीराजा जय जीजाऊ जय शिवराय || जय शिवराय ||

कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला ते माहीत नाही पण माझ्या श्री छत्रपती शिवरायांचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला !!!

विजेसारखी तलवार चालवुन गेला,

निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,

वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा फाडून गेला,

स्वर्गात गेल्यावर ज्याला देवांनी झुकून मुजरा केला,

असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला.

सह्याद्रिच्या कुशीतुन एक हिरा चमकला भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला हातात घेऊन तलवार शत्रुवर गरजला महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला.

रचूनी इतिहास सुवर्ण अक्षरांनी मनामनात ते विराजमान झाले संपली कित्येक शतके अन संपतील पुढेही प्रत्येकाच्या ओठी मात्र छत्रपती हेच नाव राहिले छत्रपती हेच नाव राहीले.

हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता,

अन्यायाविरुध्द लढण्याचा, इरादा त्यांचा नेक होता असा जिजाऊचा शिवबा, लाखात नाहीतर, जगात एक होता….

स्थापूनी हिंदवी स्वराज्य आपुले, शौर्याने लिहिली इतिहास गाथा.असे आमुचे शिवबाराजे. त्यांच्या चरणी ठेविते माथा.

आपले संपूर्ण आयुष्य देश आणि धर्मासाठी जगणारे छत्रपती शिवाजी महाराज

एक अद्वितीय योद्धा म्हणून मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी अथक लढले. एक कार्यक्षम प्रशासक म्हणून त्यांनी लोककल्याण, सुरक्षा आणि आधुनिकतेचा संगम असलेल्या हिंदवी स्वराज्याची स्थापना करून आदर्श निर्माण केला.

शिवजयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम.

जगातल्या प्रत्येक राजाच्या दरबारात स्त्री ने नाच गाणी सादर केलेले आहेत पण जगात एकमेव राजा असा झाला त्या राजाच्या दरबरात स्त्री कधीच नाचली नाही… कारण पर स्त्री ला माते समान माणने ही शिकवण राजमाता जिजाऊंनी छत्रपतींना दिली होती…