धन्य ते शिवाजी महाराज आणि धन्य त्यांचे मावळे सुंदर गीत shivjayanti git 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

धन्य ते शिवाजी महाराज आणि धन्य त्यांचे मावळे सुंदर गीत shivjayanti git 

Shivjayanti आपणास आषाढी पौर्णिमीचे म्हणजे गुरुपोर्णिमेचे महत्त्व माहित असेलच पण साधारण ३५० वर्षे आधीच्या आषाढी पौर्णिमेला शिवाजी महाराज केवळ ६०० मावळयांसोबत पन्हाळगडावरुन विशालगडाकडे निघाले होते. पण त्यांची ही वाट सोपी नव्हती. पन्हाळगडाबाहेर सिद्दी जोहर ४०००० सैन्याची फौज घेऊन बसला होता. त्या नंतर त्यावेळच्या घोडखिंडीत बाजीप्रभु देशपांडे bajiprabhu deshpande यांनी अतुलनीय साहस व पराक्रम गाजवला.

ज्या वेळी बाजी शिवाजी महाराजांसोबत विशाळगडाकडे कुच करत होते, त्याचवेळी अजुन एक मावळा एक अतुलनीय शौर्य व धाडस करत होता. तो मावळा म्हणजे शिवा काशिद. शिवा काशिद हा महाराजांचा न्हावी होता. त्याची अंगकाठी रुपरेषा ही शिवाजी महराजांसारखीच होती.

Shiva kashid जर शिवा काशिदास महाराजांचे कपडे घातले तर नवीन माणुस नक्की फसेल. त्या रात्री पन्हाळगडावरुन दोन पालख्या निघाल्या. एक महाराजांजी आणी दुसरी शिवा काशिद यांची. एक विशालगडाकडे तर दुसरी सिद्धी जोहरच्या दिशेने.

Chatrapati Shivaji Maharaj आपल्या रयतेच्या राजास वाचवण्यासाठी स्वतःहून ४०००० फौजेच्या आत गेलेला शिवा काशिद वीर मरणास प्राप्त झाला. पण मरण्याआधी प्रहर दोन प्रहर का होइना एक सामान्य मावळा राजा झाला. स्वतः मृत्युच्या मुखात गेला जेणे करुन त्याचा राजा काही अंतर का होइना शत्रु पासुन दुर जाइल.

धन्य ते शिवाजी महाराज आणि धन्य त्यांचे मावळे

सुड घेण्या अफ़जल वधाचा पेटुन उठली होती अदिलशाही,

पुणे प्रांतात धुमाकुळ घालत होती शाहिस्ता रुपी मोगलाई ।

निघाली एक फौज मोठी विजापुरी, महराज होते त्यावेळी कोल्हापुरी ।

वेढा घातला होता पन्हाळ्यास सिद्दीने, ४० हजारी फौज लढत होती जिद्दीने ।

उन पावसाची न करता तमा फौज लढली महिने चार, वेढा असाकी अवघड होते लहान मुंगीसही करणे पार |

करुन संपले प्रयत्न मराठ्यांचे पन्हाळगडाबाहेरील सारे, फ़िरले होते महाराजांचे नशिब, उलटे वाहत होते वारे । रात्री एक शोधुनी बिकट वाट गडावर आला हेर महादेव, गडावरी पाहुनी त्यास भरीला सर्वामध्ये नवा चेव | पाहत होते वाट राजगडी सर्वांसह माँसाहेब जिजाई, गाजवण्या शौर्य आले पुढे बाजीप्रभु आणी शिवा न्हाई ।

राजे निसटले पोहचली सिद्दीच्या गोटात बात, जणु काही आदिलशाहीवर झाला प्रचंड वज्रघात | अंगकाठी रुपरचना होती शिवा न्हाव्याची महाराजा सारखी,

करुनी राजांचा पोषाख भुलवण्यास गनिम तयार दुसरी पालखी । शिवा काशिदास दिसत होते समोर आहे मरण, पण गेला तो शिवाजीराजे बनुन सिद्दीस शरण |

प्रगटता रुप खरे शिवा काशिदचे, किंचाळुन तलवार फ़ाजिलखान खुपसवितो,

मरताना शिवा काशिद बोलतो ” सोंगाचा मी शिवाजी म्हणुन काय पालथा पडतो ” |

समोर दिसत होते सिद्दीरुपी शिवा काशिदास अंत, स्वराज्यासाठी केली नाही स्वामीनिष्ठेनी जिवाची खंत । गजापुरच्या घोडखिंडीत बाजीप्रभुंनी घडवला एक इतिहास, पण विसरु नका तुम्हीही शिवा काशिदचा स्वराज्याचा ध्यास |

 

Leave a Comment