छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंती दिनांक १९ फेब्रुवारी, २०२४ निमित्त विविध उपक्रमासंदर्भात shivjayanti celebration 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंती दिनांक १९ फेब्रुवारी, २०२४ निमित्त विविध उपक्रमासंदर्भात shivjayanti celebration 

या विभागाचे दिनांक २७ डिसेंबर, २०२३ परिपत्रक पहावे. सदर परिपत्रकान्वये राज्यातील राष्ट्र पुरुष / थोरव्यक्ती यांची जयंती साजरी करण्याबाबतचे निदेश दिले आहेत.

शासन निर्णय येथे पहा

👉pdf download 

 

२. शासनामार्फत दरवर्षी दिनांक १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची शासकीय कार्यालयात जयंती साजरी करण्यात येते. दिनांक १९ फेब्रुवारी चे औचित्य साधून या थोरपुरुषांचे ज्या ज्या ठिकाणी पुतळे / स्मारके आहेत, तेथे यावर्षी देखील छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात यावी.

दिनांक १८.०२.२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता सर्व अधिकारी व संबंधित विभाग प्रमुख यांनी स्वतः पुतळा परिसराची पाहणी करुन संबंधित यंत्रणांकडून रंगरंगोटी, साफसफाई व सुशोभिकरण करुन घेऊन ते झाल्याची खातरजमा करुन घ्यावी.

३. सामान्य प्रशास विभागाच्या दिनांक ०१ फेब्रुवारी, २०२३ शासन निर्णयान्वये महाराष्ट्राच्या राज्यगीताची घोषणा करण्यात आली आहे. या शासन निर्णयातील परिच्छेद क्र.२ नुसार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सदर गीत दिनांक १९ फेब्रुवारी, २०२३ पासून महाराष्ट्राचे राज्य गीत म्हणून अंगिकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

४. तसेच, दिनांक १९ फेब्रुवारी, २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता महाराष्ट्र राज्याच्या राज्य गीताचे गायन करुन सर्व संबंधित वरिष्ठ अधिकारी व संबंधित कार्यालय प्रमुख यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावे. तद्नंतर छोटेखानी सांस्कृतिक समारंभाचे आयोजन करण्यात यावे.

५. उपरोक्त उल्लेखित उपक्रम यशस्वीरित्या पार पाडावयाचे असल्याने, त्याचे योग्य व काळजीपूर्वक नियोजन करणे अत्यावश्यक आहे. त्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी दिनांक १९ फेब्रुवारी, २०२४ रोजी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे सर्व बाबींची काटकोरपणे नियोजन करुन अंमलबजावणी करावी.

Leave a Comment