मुलींना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीत तिप्पट वाढ करण्याचा राज्य शासनाचा मोठा निर्णय shishyavrutti rakkamet vadha 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुलींना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीत तिप्पट वाढ करण्याचा राज्य शासनाचा मोठा निर्णय shishyavrutti rakkamet vadha 

राज्य शासनाने मुलींच्या शिक्षणासाठी अगोदरच महत्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा राज्य सरकारकडून मुलींसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य शासनाचा धोरणात्मक निर्णय

मुलींना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीत वाढ करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.

राज्यातील इयत्ता 5 वी ते 10 वी पर्यंत शिकणाऱ्या मुलींना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती योजनांच्या रक्कमेत ही वाढ करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. या निर्णयानुसार राज्यातील इयत्ता 5 वी ते 10 वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थीनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या रक्कमेत तब्बल तिप्पटीने वाढ करण्यात आली आहे.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेच्या रक्कम वाढ 

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेतून दिली जाणारी शिष्यवृत्ती ही राज्य शासनांच्या इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य विभागामार्फत देण्यात येते. इतर मागास प्रवर्गातील इयत्ता 5 वी ते 7 वी मध्ये शिकण घेणाऱ्या फक्त मुलींना शिष्यवृत्तीच्या स्वरुपात 60 रुपये वरुन 250 प्रतिमहा अशी वाढ करण्यात आली आहे. तर विभाभज, विमाप्र व इतर मागास प्रवर्गातील इयत्ता 8 वी ते 10 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना मासिक स्वरुपात दिली जाणारी 100 रुपयांची रक्कम ही 300 रुपये प्रतिमहा अशी वाढ करण्यात आली आहे.

शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी असा करा अर्ज

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याची प्रक्रिया काय आहे? यासाठी नेमकं काय करावं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर सदर शिष्यवत्तीचा लाभ घेण्यासाठी आपल्या शाळेतील मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधावा. किंवा आपल्या जिल्ह्याच्या संबंधित प्रादेशिक उपसंचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्याशी संपर्क साधावा. या शिष्यवृत्तीमुळं शिक्षण प्रभावामध्ये मुलींचे गळतीचे प्रमाणे कमी होण्यास मदत