पवित्र प्रणालींतर्गत नव्यने रुजू झालेलया शिक्षकांना शिक्षण सेवक ऐवजी शिक्षक पदी रूजू करुन घेण्याबाबत shikshan sevak instead of teacher post
संदर्भ :- १. आपले पत्र क. शिठसं/उमाशि/८१४०/२०२२ दि.२२/०९/२०२२
२. शासन निर्णय क्रमांक एसएसएन-२०१०/(२७७/१०)/माशि-२ दिनांक १५/०९/२०११
३. शासन पत्र क्रमांक वेतन-१२२१/प्रक्र १०/टिएनटी-३ दिनांक २५/०६/२०२१
उपरोक्त संदभांधिन विषयान्वये पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदभरतीअंतर्गत नियुक्तीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांपैकी कांही उमेदवार हे स्थानिक स्वराज्य संस्था अथवा शासन अनुदानित पदांवर शिक्षक पदी कार्यरत होते, त्यामुळे त्यांचे यापुर्वीच शालार्थ प्रणालीमध्ये शालार्थ आयडी उपलब्ध आहेत. अशा शिक्षक कर्मचारी यांना संदर्भ क्रमांक ३ मध्ये नमूद केल्यानुसार संदर्भीय क्रमांक २ वरील शासन निर्णय दिनांक १५/०९/२०११ मधील अट क्रमांक १ व २ ची पुर्तता होत असल्यास त्यांना पुन्हा शिक्षण सेवक योजना लागू न करता रुजू झलेल्या पदांच्या वेतनश्रेणीतील मुळ वेतन (आरंभीचे वेतन) देण्यात यावे, कोणत्याही परिस्थितीत सद्यस्थितीत त्यांच्या चालू असलेल्या वेतनास संरक्षण देण्यात येवू नये. याबाबतचे आदेश प्राथमिक, माध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या बाबतीत संबंधित शिक्षणाधिकारी व उच्च माध्यमिक शाळेतील कर्मचारी यांच्याबाबतीत विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी निर्गमित करावेत.
वरील प्रमाणे आदेश निर्गमित केल्यानंतर अशा शिक्षक कर्मचारी यांना नव्याने शालार्थ आयडी न देता यापुर्वीच्या शाळेतून डिटॅच करुन नवीन शाळेच्या शालार्थ लॉगीनमध्ये अटॅच करण्याची कार्यवाही संबंधित वेतन पथक कार्यालयाने करावी.
(