शिक्षण सप्ताह” साजरा करणेबाबत.. दिनांक २२ ते २८ जुलै, २०२४ shikshan saptah celebration
दिनांक: १६/०७/२०२४ संदर्भ: १. मा. सचिव, भारत सरकार, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांचे पत्र क्र.D.O. No. ०२-०५/२०२४-१९.१४, दिनांक ०९ जुलै, २०२४. २. मा. उपसचिव शालेय शिक्षण विभाग यांचे पत्र क्र. संकीर्ण-२०२४/प्र.क्र.२२८/ एस.डी. ४, दिनांक १२ जुलै, २०२४
महोदय, उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने राष्ट्रीय शिक्षण धोरण२०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक २२ ते २८ जुलै, २०२४ या कालावधीत “शिक्षण सप्ताह” साजरा करणेबाबत केंद्रीय शिक्षण मंत्रालयामार्फत संदर्भ क्र. १ नुसार कळविण्यात आले आहे. शिक्षण सप्ताहात आठवडयाचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला असून, यामध्ये शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे हा शिक्षण सप्ताह विद्यार्थी, शिक्षक, धोरणकर्ते व भागधारक यांच्यामध्ये सहकार्य वाढविणारा ठरणार आहे.
विषय : “शिक्षण सप्ताह” साजरा करणेबाबत.. दिनांक २२ ते २८ जुलै, २०२४
दिनांक: १६८/०७/२०२४
संदर्भ: १. मा. सचिव, भारत सरकार, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांचे पत्र क्र.D.O. No. ०२-०५/२०२४-१९.१४, दिनांक ०९ जुलै, २०२४. २. मा. उपसचिव शालेय शिक्षण विभाग यांचे पत्र क्र. संकीर्ण-२०२४/प्र.क्र.२२८/ एस.डी. ४, दिनांक १२ जुलै, २०२४
शिक्षण सप्ताहामध्ये खालीलप्रमाणे उपक्रम रावण्याबाबत संदर्भाधीन पत्रान्वये सूचित करण्यात आलेले आहे.
संदर्भ क्र. १ तसेच सोबतच्या परिशिष्ट १ ते ७ मधील मार्गदर्शक सूचनांनुसार शिक्षण सप्ताहामधील उपरोक्त तक्त्यातील उपक्रमांची अंमलबजावणी नेमून दिलेल्या कालावधीत आपण पूर्ण करावी.
शिक्षण सप्ताहादरम्यान आयोजित उपक्रमांची छायाचित्रे व माहिती Tracker वर upload करणेबाबत दिलेल्या विहीत नमुन्यामध्ये माहिती जतन करून ठेवावी व मा. आयुक्त (शिक्षण) यांच्या निर्देशानुसार कार्यवाही करावी.
१)निपूण प्रतिज्ञा सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षक मिळून घेण्यात आली.
२) आज मी आणि माझ्या आठव्या वर्गातील विद्यार्थी मिळून शैक्षणिक साहित्य तयार केले.मूळ संख्या ,समसंख्या आणि विषम संख्यांचा तक्ता तयार केले.
३) गणिती खेळ घेण्यात आले.