महाराष्ट्र शिक्षण सेवा शिक्षण सहसंचालक या पदावर पदोन्नती देण्याबाबत shikshan sanchalak promotion
महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-अ (प्रशासन शाखा) मधील शिक्षण सहसंचालक या पदावर पदोन्नती देण्याबाबत
संदर्भः १. शासन निर्णय क्र. ईएसटी ३९१७/प्र.क्र.४६/प्रशा-२ दिनांक १७.०३.२०१७ २. शासन निर्णय क्रमांक निसूची-३६२९/प्र.क्र.२८२/प्रशा-२ दिनांक १५.१०.२०२४ (प्रत संलग्न)
आदेशः-
उपरोक्त संदर्भ क्र.०२ चा शासन निर्णय दिनांक १६.१०.२०२४ अन्वये शिक्षण उपसंचालक व समकक्ष, महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-अ (प्रशासन शाखा) संवर्गात कार्यरत असणा-या शासन निर्णयात नमूद करण्यात आलेल्या अधिका-यांना शासनाने मान्य केलेल्या निवडसूचीनुसार शिक्षण सहसंचालक व समकक्ष, गट-अ महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा) या पदांवर एस-२५ः ७८८००-२०९२०० अशा सुधारीत वेतन संरचनेत ज्येष्ठतेनुसार व गुणवत्तेनुसार रिक्त असलेल्या ०९ पदांवर संदर्भाधीन शासन निर्णयातील सर्व नमूद अटीच्या अधीन राहून त्यांच्या नावासमोर स्तंभ क्र. ०४ येथे नमूद केलेल्या पदावर तात्पुरती पदोन्नती देण्यात आलेली आहे. तसेच सदर शासन निर्णयामध्ये श्री. संदीप प्रमोद संगवे यांच्या नावासमोर स्तंभ क्र. ०४ मध्ये दर्शविण्यात आल्यानुसार पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे शासन स्तरावरून काढण्यात येतील.
२/- त्यानुसार पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आलेल्या सर्व अधिका-यांना संदर्भ क्र.०१ दिनांक १७.०३.२०१७ च्या शासन निर्णयामधील अटी व शर्तीच्या अधीन राहून कार्यमुक्त करण्यात येत आहे. संबंधित अधिका-यांच्या पदाचा प्रभार सोबत जोडलेल्या विवरण पत्र “अ” मध्ये दर्शविण्यात आलेल्या अधिका-यांकडे पुढील आदेश होईपर्यंत देण्यात येत आहे. त्यांच्याकडे कार्यभार सुपूर्व
करून पदोन्नतीच्या पदावर रूजू व्हावे. ३/ संबंधित कार्यालय प्रमुखांनी त्यांना रुजू करुन घ्यावे. रुजू झाल्यानंतर रुजू अहवाल शासनास व या कार्यालयास तात्काळ सादर करावा.
सोबत प्रभार विवरणपत्र-अ