माहे ऑगस्ट, २०२४ केंद्रस्तरावर शिक्षण परिषदेच्या आयोजनाबाबत shikshan parishad
संदर्भ: १) शासन निर्णय क्र. गुवि/२०१५ (८०/१५) एस.डी.६ दि.२२ जून, २०१५ २) शासन निर्णय क्र. शेगुवि/२०१६ (२२/१६) एस.जी. ६ दि. १६ सप्टेंबर, २०१६
३) शासन परिपत्रक संकीर्ण ३२१६/(९४/२०१६) प्रशिक्षण दि.१ सप्टेंबर, २०१६
४) प्रस्तुत कार्यालयाचे जा.क्र. विभिप्रसंमो/शिक्षण परिषद/वा.नि.वे./२०२४/३६८ दि.११/०६/२०२४
५) जिल्हास्तरीय गुणवत्ता कक्ष बैठक दि.९ जुलै, २०२४ रोजी झालेली प्रत्यक्ष चर्चा.
उपरीक्त विषयान्वये संदर्भ क्र.१ व २ नुसार राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत सर्वच स्तरावर यंत्रणा कार्यप्रेरित होऊन योग्य दिशेने १०० टक्के मुने शिकण्याच्या उद्देशाने काम करत आहेत. त्यात्ताठी केंद्रस्तरीय निक्षण परिषदा लाभदायक ठरत आहेत, त्याचप्रमाणे १०० टक्के शाळा, केंद्र, बीट प्रगत करण्यासाठी अवलंबित करण्यासाठी आलेल्या प्रक्रिया, पध्दती, तंत्र व कौशष्य या बाबींचा सादरीकरणामध्ये समावेश असतो. त्याचा उपयोग निक्षण परिषदेमध्ये उपस्थित असणा-या शिक्षकाना होताना दिसून येतो.
मंदर्भ ४.३ अन्वये गाच धर्तीवर राज्यातील सर्व समूह साधन केंद्रस्तरावर दरमहा शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात यावे असे शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. त्यानुसार संपूर्ण केंद्र शाळाबाह्य मूल विरहीत करण्यासाठीचे नियोजन व उपाययोजना, १०० टक्के मुलांची नियमित उपस्थिती, वाचन कार्यक्रम, स्वच्छता प्रकिया अहवालातील दर्शके, पी.जी.आय. मधीन दर्शक इ. बाबींचाही त्यामध्ये समावेश कराया. तसेच केंद्रांतर्गत सर्व शाळा १०० टके प्रगत करण्यासाठीची चर्चा, नियोजन व कृती आराखडा या शिक्षण परिषदांच्या माध्यमातून तयार करून त्याप्रमाणे प्रत्यक्ष उद्दिष्ट प्राप्ती करण्यासाठी अंमलबजावणी करण्यात यावी असे निर्देश देण्यात आलेले होते.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयाकडून दरमहा प्रसिध्द होणा-या जीवन शिक्षण अंक माहे जुलै २०२२ या विशेषांकमध्ये शिक्षण परिषद या विषयावरील विविध लेख देण्यात आलेले आहेत. सदर पुस्तिकांचा उपयोग आपल्या जिल्ह्यातील शिक्षण परिषदा आयोजन करताना केल्यास शिक्षण परिषदेचा मूळ उद्देश साध्य होईल व जिन्हातील प्रत्येक मुलाची गुणवत्तापूर्ण शिक्षणाची वाटचाल सुकर होण्यास मदत होईल.
संदर्भ क्र.४ अन्वये सदर शिक्षण परिषदांचे आयोजन प्रभावीपणे होण्यासाठी व समन्वय राहण्यासाठी आपल्या कार्यालयातील जबाबदार अधिका-याची नियुक्ती करण्यात यावी. तसेच, सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामधील शिक्षण
परिषदांचे दरमहाचे नियोजन देण्यात आले होते. शिक्षण परिषदेचे आयोजन दर महिन्याच्या चौथ्या गुरवारी दु. २:०० ते ५:०० या कालवधीत आयोजन करण्यात यावे, सदर दिवशी सुट्टी आल्यास लगतच्या कार्यालीन दिवशी घेण्यात यावी.
तथापि माहे ऑगस्ट, २०२४ मधील केंद्रस्तरीय शिक्षण परिषद पाचव्या गुरवारी घेण्यात येणार आहे. तरी सदर शिक्षण परिषदेच्या वेळी इतर कोणतेही उपक्रम/कार्यक्रम (उदा. सत्कार समारंभ आयोजित करण्यात येऊ नयेत. तसेच शिक्षण परिषदेला इ. १ ली ते ८ वी ला अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य आहे. या कार्यालयाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या गुगल फॉर्म लिंक मध्ये शिक्षण परिषदेचा व उपस्थितीचा अहवाल तत्काळ भरण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी. या बाबतची सपूर्ण कार्यबाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी असे सूचित करण्यात यावे.
माहे ऑगस्ट, २०२४ मध्ये केंद्रस्तरावर शिक्षण परिषदेच्या आयोजनासाठी सर्व केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गट/शहर साधनकेंद्रातील विषयतज व गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती (सर्व) प्रशासन अधिकारी, म.ना.पा.सोलापूर यांना मार्गदर्शन करण्यासाठी ऑनलाईन जिल्हास्तरीय बैठक दि.२६ ऑगस्ट, २०२४ रोजी दु. ११:३० वा. आयोजन करण्यात आली आहे. तरी सदर बैठकीत सोबतच्या नियोजनाप्रमाणे विविध विषयाचे अद्यावत माहिती व शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी सर्व संबधीतानी सदर ऑनलाईन बैठकीस वेळेत उपस्थित राहवे. सदर ऑनलाईन बैठकीची लिंक व्हाटसऍप ग्रुपवर पाठविण्यात येईल.
सोबत जिल्हास्तरीय ऑनलाईन बैठकीचे वेळापत्रक व माहे ऑगस्ट, २०२४ मधील केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे वेळापत्रक जोडण्यात आले आहे. तरी आपल्या स्तरावरून योग्य ते आदेश निर्गमित करण्यात यावेत.