शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक संपूर्ण प्रक्रिया कशी असते ते पाहूया shikshak padvidhar matdarsangh 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
shikshak padvidhar matdarsangh 
shikshak padvidhar matdarsangh

शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक संपूर्ण प्रक्रिया कशी असते ते पाहूया shikshak padvidhar matdarsangh 

विधान परिषदेची रचना कशी असते ते आधी पाहूया

राज्यांमध्ये विधानपरिषद या वरिष्ठ सभागृहाचे एकूण 78 सदस्य असतात यातले 31 सदस्य महाराष्ट्र विधानसभा आमदार निवडून देतात तर 21 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडले जातात आणि बारा जणांची नेमणूक राज्यपाला करतात तसेच सात उमेदवार शिक्षक मतदार संघातून तर सात उमेदवार पदवीधर मतदारसंघातून निवडून येतात हे पदवीधर व शिक्षक मतदार संघ पुढीलप्रमाणे

नागपूर,अमरावती,नाशिक,कोकण,पुणे,मुंबई,छत्रपती संभाजी नगर असे सात मतदारसंघ आहेत यामधून शिक्षक व पदवीधर मतदारसंघ तील उमेदवार निवडून जातात.

विधान परिषदेमध्ये दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सदस्य निवृत्त होतात आणि त्यांच्या जागी नवीन निवडणूक होऊन तितकेच सदस्य नव्याने निवडून येतात.

पदवीधर मतदार संघ म्हणजे काय? 

महाराष्ट्रात विधानसभेप्रमाणेच विधानपरिषदही आहे ज्यामध्ये आमदार हे नगरसेवक जिल्हा परिषद सदस्यांमधून आमदारांमधून शिक्षकांमधून किंवा पदवीधरांमधून निवडून दिले जातात समाजातील निरनिराळ्या घटकांना लोकशाही प्रक्रियेत स्थान मिळावं त्यांना प्रतिनिधित्व मिळावं अशी त्यामध्ये रचना असते महाराष्ट्राच्या विविध भागातील पदवीधर व त्या त्या भागातून त्यांचा प्रतिनिधी आमदार निवडून दिले जातात. पदवीधर मतदार संघ असतो ही गोष्ट खेडेगावातील मतदारांना जास्त प्रमाणात माहिती नाही याचा प्रसार करणे ही एक महत्त्वाची बाब आहे प्रत्येक जिल्ह्याला पदवीधर मतदारसंघ असतो त्या मतदारसं घा मधून पदवीधारक निवडणुकीसाठी पात्र असतो सर्व नोंदणी केलेले पदवीधारक मतदार पदवीधर उमेदवारास मतदान करतात व त्याला निवडून दिले जाते नंतर तो त्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतो आणि पदवीधारकांचे विविध प्रश्न सोडवण्याचे काम त्याला करावे लागते तो विधान परिषदेचा आमदार म्हणून कार्य पाहतो.

➡️पदवीधर मतदार नोंदणी करता आवश्यक पात्रता

1. सर्वप्रथम तो भारताचा नागरिक असावा

2. तो मतदार नोंदणी करिता अहर्ता दिनांकाच्या किमान तीन वर्षांपूर्वी मान्यता प्राप्त विद्यापीठाचा किंवा तत्सम विद्यापीठाचा पदवीधर असावा.

3. त्याने विहित कागदपत्रांसह फॉर्म क्रमांक 18 भरलेला असावा.

4. सर्वसाधारणपणे संबंधित मतदारसंघातील रहिवासी असल्या पाहिजे.

5. पदविका जर पदवीतुल्य असेल तरच पदवीधर गृहीत धरण्यात येईल.

शिक्षक मतदार संघ 

महाराष्ट्रामध्ये विधानसभेप्रमाणेच विधानपरिषद ही आहेत ज्याचे आमदार हे नगरसेवक जिल्हा परिषद सदस्यांमधून आमदारांमधून शिक्षकांमधून किंवा पदवीधरांमधून निवडून दिले जातात समाजातील वेगवेगळ्या घटकांना लोकशाहीमध्ये स्थान मिळावे अशी त्यामागची संकल्पना आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक यासाठी मतदान करू शकतात यातून निवडलेल्या शिक्षक आमदारांनी शिक्षकांचे प्रश्न विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये मांडायचे असतात ही मतदाराकडून अपेक्षा असते

सध्याच्या परिस्थितीमध्ये शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी जिल्हा परिषद शिक्षकांनाही मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी सर्व संघटनांचे खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न चालू आहेत

➡️शिक्षक मतदार नोंदणी करिता पात्रता खालील प्रमाणे 

1. तो भारताचा नागरिक असला पाहिजे.

2. त्याने मतदार नोंदणी करिता अहर्ता दिनांकाच्या लगतच्या सहा वर्षात किमान तीन वर्षे माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून पूर्ण वेळ काम केलेले असावे.

3. सर्वसाधारणपणे संबंधित मतदारसंघातील तो रहिवासी असावा.

4. त्याने विहित कागदपत्रांसह फॉर्म क्रमांक 19 भरावा.

➡️जे शिक्षक पदवीधर आहेत असे शिक्षक आणि पदवीधर अशा दोन्ही मतदारसंघात मतदान करू शकतात

1. रहिवासाचा पुरावा

(पासपोर्ट वाहन अनुज्ञापती टेलिफोन विज बिल किंवा इतर मान्यता प्राप्त कागदपत्रांची साक्षांकित प्रत)

2. गुणपत्रकाची साक्षांकित प्रत

3. पदविका व पदविकेची साक्षांकित प्रत

4. ओळखपत्र

5. शिक्षक असल्यास नोकरी करीत असल्याबाबतचे मुख्याध्यापकाचे पत्र.

6. विवाहित महिलेने विवाह नंतर नाव बदलले असल्यास त्याबाबतचे राजपत्र, पॅन कार्ड, राजपत्र नसल्यास प्रतिज्ञापत्र.

➡️साक्षांकन कसे करावे 

प्रमाणपत्राचे साक्षांकन संबंधित जिल्ह्यात कार्य रत असलेल्या तहसीलदार किंवा गटविकास अधिकारी किंवा शासन मान्यता प्राप्त विद्यालयाचे प्राचार्य किंवा जिल्ह्यातील अन्य राजपत्रित अधिकाऱ्याकडून करून घ्यावे.

➡️अर्ज व कागदपत्रे सादर करणे बाबत 

मतदार नोंदणी अर्ज आणि कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती आपल्या विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक नोंदणी अधिकारी तसेच सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी किंवा अन्य नामनिर्देशित अधिकारी यांना समक्ष किंवा पोस्टाने ही सादर केल्या जाऊ शकतात शक्यतो ही कागदपत्रे समक्ष सादर करून त्यांची पोस्ट घ्यावी तसेच अद्यावत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यात स्वतःचे नाव असल्याचे खात्री देखील करावी.

➡️मतदान कसे करावे त्यासंबंधी माहिती 

1.पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी मतदान हे मतपत्रिकेवर करावे लागते

2. मतपत्रिकेवर नमूद उमेदवार क्रमांका नुसार उमेदवारांना पसंती क्रमांक द्यायचा असतो.

3. बॅलेट म्हणजे मतपत्रिकेवर शिक्का मारून मतदान होईल त्यामुळे मतदारसंघात हजर राहून मतदान करणं आवश्यक आहे.

4. मतदानाच्या वेळी प्रत्यक्ष उपस्थित असणे गरजेचे आहे.

5. सर्वात पहिली पसंती असणाऱ्या उमेदवारासमोर मराठी इंग्रजी किंवा रोमन यापैकी एका भाषेतील आकड्यांमध्ये अंक लिहिता येतात.

6. पसंती क्रमांक लिहिताना तो एका भाषेतील आकडे मध्येच असावा.

7. मतपत्रिकेवर पसंती क्रमांक सोडून दुसऱ्या कसल्याही खोडतोड करू नयेत.

8. मतपत्रिकेवर पसंती क्रमांक लिहिताना स्वतःचा पेन किंवा पेन्सिल वापरण्यास परवानगी नाही.

9.नोटा पर्याय उपलब्ध मतपत्रिकेवर नोटा पर्याय उपलब्ध असणार आहे वरीलपैकी कोणी नाही असा तो पर्याय असेल

 

2 thoughts on “शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक संपूर्ण प्रक्रिया कशी असते ते पाहूया shikshak padvidhar matdarsangh ”

Leave a Comment