प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण २.० या प्रशिक्षणाच्या आयोजनाबाबत shikshak kshamta vruddhi training 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण २.० या प्रशिक्षणाच्या आयोजनाबाबत shikshak kshamta vruddhi training 

संदर्भः १. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पुणे यांचे पत्र जा.क्र. जिशिवप्रसं/२०२४-२५/६४ दिनांक १४.०१.२०२५

२. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पुणे यांचे पत्र जा.क्र. जिशिवप्रसं/२०२४-२५/१२३ दिनांक २८.०१.२०२५

उपरोक्त विषयान्वये, राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार राज्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता विषयक विविध उपक्रमांची अंमलबजावणी सुरु आहे. त्यासाठी शालेय शिक्षणाच्या सर्व स्तरावरील शिक्षकांचे सक्षमीकरण होणे आवश्यक आहे. त्यानुसार राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक ‘शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण २.०’ आयोजन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे. या संस्थेच्या अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या मार्फत करण्यात येत आहे.

जिल्हास्तरावर सिंहगड इंस्टीट्यूट, लोणावळा येथे प्रशिक्षण घेतलेले शिक्षक हे दि. १० फेब्रुवारी ते ०८ मार्च २०२५ या दरम्यान वेगवेगळ्या प्रशिक्षण वर्गांच्या माध्यमातून होणाऱ्या तालुकास्तरीय प्रशिक्षणासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम करणार आहेत. शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण २.० हे इ. १ ली ते ते ५ वी तसेच इ. ६ वी ते ८ वी आणि इ.९ वी ते १२ वी इयत्तांना शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी असणार आहे. सदर प्रशिक्षणामध्ये पुढील विषयांचा समावेश असेल राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०, राज्य अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत शिक्षण) २०२३, राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) २०२४, शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF), क्षमताधारित मूल्यांकन, संकल्पना व कार्यनीती, क्षमताधारित अध्ययन अध्यापन प्रक्रिया, क्षमताधारित प्रश्ननिर्मिती, उच्च विचारप्रवर्तक प्रश्न (HOT), अध्ययन निष्पत्तीनुसार प्रश्ननिर्मिती, समग्र प्रगतीपत्रक (HPC) संकल्पना व स्तरनिहाय स्वरुप, इत्यादी.

तालुका / URC स्तरीय प्रशिक्षणाचे सविस्तर नियोजन पुढीलप्रमाणे आहे.

उपरोक्त नियोजनाप्रमाणे आपल्या शाळेतील इ. १ ली ते १२ वी ला शिकविणाऱ्या सर्वच शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण होणे बंधनकारक असल्याने मुख्याध्यापक / प्राचार्य / शाळाप्रमुख यांनी आपल्या शाळेचे/क. महाविद्यालयाचे आवश्यक तसे नियोजन करून उपरोक्त नमूद इयत्तेच्या शिक्षकांना प्रशिक्षणासाठी उपस्थित ठेवावयाचे आहे.

Join Now