शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२ नुसार पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीबाबत shikshak bharti update 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२ नुसार पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीबाबत shikshak bharti update 

शैक्षणिक संस्था/व्यवस्थापनांसाठी सूचना ‘मुलाखतीसह’ हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांच्या जाहिरातीतील रिक्त जागांसाठी उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारशीबाबत.

• शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२ नुसार पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे. मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय दिलेल्या शैक्षणिक संस्थांना उमेदवारांचे मुलाखत व अध्यापन कौशल्य यांसाठी चाचणी परीक्षेतील गुणवत्तेनुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिनांक ०७/०८/२०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

“मुलाखत अध्यापन कौशल्य” यांसाठीची कार्यवाही व्यवस्थापनांकडून करण्यास दिनांक ०९/०८/२०२४ ते ३१/०८/२०२४ असा देण्यात आलेला कालावधी संपुष्टात आला आहे.

सदर मुलाखत व अध्यापन कौशल्यनंतर निवडलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्यापूर्वी, निवड प्रक्रियेतील प्रशासकीय कार्यवाही करण्यासाठी पोर्टलवरील आवश्यक नोंदी पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी शैक्षणिक संस्था/व्यवस्थापनस्तरावरील मुलाखत व अध्यापन कौशल्यनंतर पोर्टलवर गुणदान, निवड, प्रतीक्षाधीन इत्यादी आवश्यक नोंदी करण्यासाठी दिनांक ०७/०९/२०२४ पर्यंत पोर्टलवर सुविधा सुरू राहील.

पवित्र पोर्टल वरील निवड प्रक्रियेची पूर्ण माहिती नोंद केल्यानंतरच, निवड केलेल्या उमेदवारांना संस्थास्तरावरून प्रत्यक्ष नियुक्त आदेश निर्गमित करता येतील.

“मुलाखतीसह” या प्रकारातील “मुलाखत व अध्यापन कौशल्य यांसाठीच्या नोंदी दिनांक ०७/०९/२०२४ नंतर व्यवस्थापनस्तरावरून करता येणार नाहीत याची नोंद घ्यावी.