शिक्षक भरती प्रक्रियेची अधिसूचना यासाठी मागितलेली माहिती मिळणेबाबत ! माहितीचा अधिकार अर्जाची दखल shikshak bharti right to information
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत मागितलेली माहिती मिळणेबाबत
संदर्भ :- १. श्री. राजेंद्र फुलावरे यांचा दिनांक ०१.०८.२०२४ चा माहित्ती अधिकार अर्ज
२. प्रथम अपिलीय प्राधिकारी तथा उपसचिव यांचे दि.२३.०९.२०२४ रोजीचे आदेश.
३. समक्रमांकीत शासन पत्र दि.०१.१०.२०२४
संदर्भ क्र.१ येथील माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अन्वये दाखल अर्जान्वये मागितलेली माहितीस अनुसरुन माहिती उपलब्ध असल्यास आपल्या स्तरावरुन अर्जदारास उपलब्ध करुन देण्यात यावी सोबत अर्जाची प्रत पाठविण्यात येत आहे)
..न्यायासाठी संपूर्ण यंत्रणा हलवून सोडणारा अवलिया…. राजाभाऊ! 2006/07/08 साली झालेल्या शिक्षक भरती प्रक्रियेची अधिसूचना मिळवल्याशिवाय ही लढाई थांबणार नाही!*
एक वर्षभरापूर्वी ,….एक नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत मात्र ज्यांची जाहिरात एक नोव्हेंबर 2005 पूर्वी आहे अशा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी प्रयत्न केले आणि ते यशस्वीही झाले ….. तशीच लढाई अगदी याच धर्तीवर सुरू झाली ती म्हणजे 2006 /07/08 साली सेवेत हजर झाले मात्र शिक्षक भरतीची अधिसूचना /शासन निर्णय हा 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीची असण्याची दाट शक्यता आहे…. ज्यामुळे राज्यभरातील वीस हजारहून अधिक शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू होईल, त्यासाठी शोधमोहीम सुरू केली. अगदी जिल्हा परिषदेपासून सुरू झालेली ,ही शोध मोहीम ….शिक्षण सचिव कार्यालयापर्यंत येऊन थांबली थांबलीच नव्हे तर आजतागायत सुरूच आहे ,आतापर्यंत जी काही माहिती मिळाली ती माहिती योग्य असून अंतिम टप्प्यात आहे ….या अंतिम टप्प्यातील माहिती मिळवण्यासाठी दस्तूर खुद्द शिक्षण उपसचिव साहेब,ग्रामविकास सचिव साहेब ,यांनी संबंधित आस्थापना विभागास माहिती उपलब्ध करून देण्याचे आदेशही दिलेले आहेत… संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या अधिसूचनेकडे सर व यांच्या टीमची योग्य दिशेने वाटचाल सुरू आहे लवकरच माहिती मिळेल अशी अपेक्षा सर्वजण ठेवून आहेत… मात्र लढाई कठीण जरी असली तरीही मुळीच मागे थांबणार नाही! अशी भूमिका घेऊन असलेले आमचे मित्र राजेंद्र फुलावरे!…. या अवलियाने अधिसूचना मिळावी म्हणून जवळपास 40 ते 50 हुन अधिक माहिती अधिकार टाकून , बैठका घेऊन….झेडपी ते मंत्रालय….. मंत्रालय ते शिक्षण संचालक कार्यालय असा प्रवास सुरूच ठेवलेला आहे एवढेच नव्हे तर राज्य माहिती आयोग, माहिती पुराभिलेख- संचालनालय ,यांच्याकडेही जोरदार पाठपुरावा सुरू आहे. संबंधित प्रश्नासाठी अगदी तीन _ तीन तास सचिव कार्यालयात सुनावणीही झालेल्या आहेत मात्र माझा हा मित्र अधिसूचनेवर ठाम आहे….त्यांनी सुरू ठेवलेल्या या महत्त्वपूर्ण व न्यायिक मार्गात लवकरच यश मिळो हीच प्रार्थना! मित्रा तुला लवकरच यश येईल!!! आता तुझ्या माहिती अधिकारात व तू मागितलेल्या माहितीसाठी दस्तूर खुद्द शिक्षण संचालक साहेब ,शिक्षण उपसचिव साहेब, शिक्षण सचिव साहेब, ग्रामविकास सचिव साहेब, संबंधित कक्ष अधिकारी ….संबंधित विभागास आदेश देत आहेत … अनेक महत्त्वपूर्ण माहितीही तू प्राप्त केलेली आहे म्हणजेच तुझी दिशा व वाटचाल योग्य दिशेने आहे एवढं नक्की!….. *आजपर्यंत तुझ्याबरोबर आलेल्या अनुभवावरून तू दिलेल्या लढ्यावरून मला खात्री आहे की, यश तुला नक्कीच मिळेल आणि ते मिळाल्याशिवाय तू ही थांबणार नाही!!*
*एकच मिशन . जुनी पेन्शन!!*
🙏🙏🙏
*श्रीधर शेंडे*
जिल्हा कार्याध्यक्ष
*महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन रायगड*