सकाळी नऊ वाजेच्या आधी शाळा भरवली तर होणार कारवाई शिक्षण विभागाचा इशारा : शासन निर्णयाचे उल्लंघन पडणार महागात shaley school time table
लोकमत न्यूज नेटवर्क जालना : चौथीपर्यंतच्या सर्वच शाळा सकाळी ९ वाजेनंतर भरविण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्याबाबत शालेय शिक्षण विभागाने आदेश निर्गमित केले आहेत. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षात सकाळी ९ वाजेच्या आधी कोणी चौथीपर्यंतची शाळा भरविली तर संबंधितांना कारवाईला सामोरे जावे लागणार
लहान मुलांच्या अर्थात चौथीपर्यंतच्या मुलांच्या शाळा सकाळी लवकर भरविल्या जात होत्या. शाळा लवकर असल्यामुळे लहान मुलांची झोप पूर्ण होत नव्हती. त्याचा परिणाम आरोग्यावर होत होता. ही बाब पाहता शासनाने चौथीपर्यंतच्या सर्व माध्यमांच्या शाळा सकाळी ९ वाजेनंतर भरविण्याचा निर्णय घेतला आहे. वयाची अंमलबजावणी या शैक्षणिक वर्षापासून होत आहे.
सकाळी नऊनंतर भरवा चौथीपर्यंतच्या शाळा
■ शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून चौथीपर्यंतच्या सर्व माध्यमांच्या शाळा या सकाळी ९ वाजेनंतर भरवण्याचा निर्णय झाला आहे.
■ शासन आदेशाचे पालन करीत चौथीपर्यंतच्या सर्व शाळा सकाळी ९ वाजेनंतर भरवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
याआधी शाळा भरवण्यासाठी हवी परवानगी
■ शाळा सकाळी ९ वाजेच्या आधी भरवायची असेल तर शिक्षणा- धिकारी यांची परवानगी घ्यावी लागणार आहे.
■ शाळांनी आवश्यक ते कारण नमूद करणे गरजेचे आहे.
दोन शाळांकडून मागणी
■ शासनाने चौथीपूर्वीच्या शाळा सकाळी ९ वाजेनंतर भरवाव्यात.
अशा सूचना दिल्या आहेत.
■ जालन्यातील दोन संस्थांनी शाळा सकाळी ९ वाजेच्या आधी भरविण्याची मागणी शिक्षण विभागाकडे केली आहे.
■ या मागणीवर अद्याप निर्णय झालेला नाही.
शासनाने चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ वाजेनंतर भरवण्याचे आदेश दिले आहेत. त्याबाबत सर्व शाळा,
संस्थाचालकांना सूचना दिल्या आहेत. कोणी आदेशाचे उल्लंघन केले तर कारवाई होईल. – कैलास दातखीळ, शिक्षणाधिकारी प्राथमिक