शालेय अभिलेखे जतन कालावधी शासन निर्णयानुसार pdf उपलब्ध shaley abhilekhe jatan kalavadhi
शालेय स्तरावर विविध प्रकारचे अभिलेखे असतात त्यामध्ये शालेय रजिस्टर शिक्षक हजेरी विद्यार्थी हजेरी विद्यार्थ्यांची परीक्षेचे पेपर तसेच विविध प्रकारचे रजिस्टर दाखल खारीज रजिस्टर विविध नोंदवहय मूल्यमापन नोंदवही सर्व रेकॉर्ड जतन करण्यासाठी विशिष्ट प्रकारचा कालावधी असतो तो कालावधी शासन निर्णयानुसार खालील प्रमाणे आहे.
अभिलेखे जतन कालावधी
अ.क्र. अभिलेख श्रेणी अभिलेखाचे नावजतन करावयाचा कालावधी
(01) अ सर्वसाधारण प्रवेश नोंदवही /जनरल रजिस्टर -कायम
(02) अ फर्निचर, ग्रंथालय,
प्रयोगशाळा साधनसामग्री इ. संग्रह नोंदवही -कायम
(03) अ परिपत्रके, आदेश फाईल कायम
(04) अ भविष्य निर्वाह निधी लेखा नोंदवही कायम
(05) अ मुख्याध्यापकाचे लॉगबुक कायम
(06) ब रोकड वही / खतावणी (सादील / वेतनेतर अनुदान) 30 वर्षे
(07) ब कर्मचा-यांचे पगारपत्रक पावत्या, वेतनस्थिती 30 वर्षे
(08) ब विवरण पत्र – लेखा परीक्षित विवरणपत्रासह निरीक्षण अहवाल 30 वर्षे
(09) ब नेमणूक केलेल्या शिक्षकांकडून मिळालेली कार्यमुक्ती प्रमाणपत्र 30 वर्षे
(10) ब रोकड वही / खतावणी (स.शि.अ.) 30 वर्षे
(11) ब विद्यार्थी संचयी नोंदपत्रक 30 वर्षे
(12) ब सेवा पुस्तिका कर्मचारी शाळेत काम करीत असेपर्यंत व नंतर 2 वर्षे
(13) क-1 इतर शाळेकडून मिळालेली शाळा सोडल्याची प्रमाणपत्रे 10 वर्षे
(14) क-1 शाळा सोडल्याचे दाखले 10 वर्षे
(15) क-1 फी, पावतीपुस्तके / फी वसुली नोंदवही 10 वर्षे
(16) क-1 आकस्मिक खर्च नोंदवही, बिले प्रमाणके 10 वर्षे
(17) क-1 विद्यार्थी व कर्मचारी हजेरी पत्रके 10 वर्षे
(18) क-1 वसतिगृह खोलीभाडे
नोंदवही 10 वर्षे
(19) क-1 महत्त्वाच्या स्वरूपाचा संकीर्ण पत्रव्यवहार 10 वर्षे
(20) क-1 फी माफी व शिष्यवृत्तीसाठई केलेले अर्ज आणि विविध सवलती बिलांच्या कार्यालय प्रती 10 वर्षे
(21) क-1 सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंद वही (वार्षिक नोंदी बाबत) 10 वर्षे
(22) क-2 जमा खर्च दर्शविणारी खातेवही व सत्र फीसाठी वेगळी खातेवही 5 वर्षे
(23) क-2 आवक-जावक नोंदवह्या व
मुद्रांक (तिकिट) हिशोब 5 वर्षे
(24) क-2 रोकडवही (शा. पो. आ.) 5 वर्षे
(25) क-2 शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ / माता पालक संघ इतिवृत्त नोंदवही 5 वर्षे
(26) ड सर्व वर्गांच्या मूल्यमापन उत्तरपत्रिका (विद्यार्थ्यांना परत न करावयाच्या) 18 महिने
(27) ड शिक्षक व अन्य कर्मचा-यांचे नैमित्तिक रजेचे अर्ज 18 महिने