शालार्थ प्रणालीमध्ये थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यास मुदतवाढ देणेबाबत shalarth thakit vetan deyak 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शालार्थ प्रणालीमध्ये थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यास मुदतवाढ देणेबाबत shalarth thakit vetan deyak 

. संदर्भ- १) संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा/२०२४/टी-७/शालार्थ/थकीत/ऑनलाईन/५०४७ दि. ११/९/२०२४

२) श्री. शिवाजी खांडेकर, सरकार्यवाह, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ यांचे निवेदन क्र. ४१/२०२४ दि. २०/९/२०२४.

३) श्री. के. एस. ढोमसे, अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक, संयुक्त महामंडळ, पुणे यांचे ईमेलवर प्राप्त निवेदन क्र. ७२/२०२४-२५ दि. २४/९/२०२४

४) अधीक्षक, वेतन व भ.नि.नि. पथक (माध्यमिक) लातूर यांचे पत्र क्र. वेप/माध्य/ला/आस्था/ २०२४/७८२ दि. २४/९/२०२४.

हे ही वाचा👇

👉सन 2024 दिवाळी सुट्टी या वर्षी वीस दिवस असणार

👉नियतकालिक मूल्यमापन चाचणी PAT-2 शासन परिपत्रक

👉 थकीत वेतन बील ऑनलाईन सादर करणे बाबत

👉विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साहित्य खरेदी बाबत gr 

👉शाळा मान्यता/दर्जावाढ/नवीन वर्ग मान्यता साठी निकष व तपासणी सूची शासन निर्णय

५) अधीक्षक, वेतन व भ.नि.नि. पथक (माध्यमिक) वर्धा,

सातारा, अमरावती, यांचे ईमेलद्वारे प्राप्त झालेले पत्र.

उपरोक्त विषयी संदर्भ क्र. १ अन्वये सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांची थकीत देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्यासाठी दि. २५/९/२०२४ पर्यंत मुदत देण्यात आलेली होती.

तथापि सध्या शालार्थ वेतन प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणीमुळे शाळांना थकीत देयके ऑनलाईन सादर करणे शक्य नाही. तसेच शालार्थ प्रणाली बंद असल्याने थकीत देयके ऑनलाईन फॉरवर्ड करण्यास किमान एक महिन्याची मुदतवाढ मिळणेबाबत संदर्भ क्र. २ व ३ अन्वये विनंती करण्यात आलेली आहे. तसेच काही वेतन पथक (माध्यमिक) कार्यालयाकडूनही शालार्थ प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणीमुळे थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यास मुदतवाढ मिळणेबाबत विनंती केलेली आहे.

उपरोक्त वस्तुस्थितीचा विचार करता डिडिओ-१ (मुख्याध्यापक) स्तरावरून थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यासाठी दि. ५/१०/२०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. त्यानंतर सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी थकीत देयके ऑनलाईन सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार नाही. याची नोंद घ्यावी.

प्रत- श्री. पवन जोशी, प्रोजेक्ट लिड, शालार्थ सिस्टीम, महाआयटी, मुंबई यांना उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की,

शालार्थ प्रणालीमध्ये थकीत देयके ऑनलाईन सादर करण्याकरीता आलेल्या तांत्रिक अडचणीचे तात्काळ निराकरण करावे. तथापि

थकीत देयके ऑनलाईन सादर करण्याचा टॅब/सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावा. व सदरची प्रणाली सुरळीतपणे सुरू

राहील याची दक्षता घ्यावी.

प्रत- माहितीस्तव सविनय सादर.

१) मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे-१

२) श्रीम. रोहीणी किरवे, कक्ष अधिकारी, टिएनटी-३, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई-३२

shalarth thakit vetan deyak 

👉👉👉शालार्थ वेतन देयक मुदतवाढ बाबत परिपत्रक येथे पहा