शालार्थ प्रणालीमध्ये थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यास मुदतवाढ देणेबाबत shalarth bill online deyak 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शालार्थ प्रणालीमध्ये थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यास मुदतवाढ देणेबाबत shalarth bill online deyak 

संदर्भ- १) संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा/२०२४/टी-७/शालार्थ/थकीत/ऑनलाईन/५०४७ दि. ११/९/२०२४.

२) संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा/२०२४/टी-७/शालार्थ/थकीत/ऑनलाईन/मुदतवाढ/५१८६ दि. २५/९/२०२४.

उपरोक्त विषयी संदर्भ क्र. १ अन्वये सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांची थकीत देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्यासाठी दि. २५/९/२०२४ पर्यंत मुदत

देण्यात आलेली होती. तसेच संदर्भ क्र. २ अन्वये शाळांना थकीत देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्यासाठी दि.

०५/१०/२०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती. तथापि अद्यापही काही शाळेतील कर्मचा-यांचे थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यात आलेली नाही त्यामुळे वेतन पथक (माध्यमिक) कार्यालयाकडून थकीत देयके ऑनलाईन सादर करणेबाबत मुदतवाढ देणेबाबत विनंती केलेली आहे.

शासन परिपत्रक येथे पहा click here 

उक्त प्रकरणी क्षेत्रिय कार्यालयाकडून करण्यात आलेली मागणी तसेच शालार्थ प्रणालीमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणीचा विचार करता डिडिओ-१ (मुख्याध्यापक) स्तरावरून थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यासाठी दि. १५/१०/२०२४ अखेर अंतिम मुदत राहील. त्यानंतर सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात

येणार नाही. याची नोंद घ्यावी. ३) याबाबत संबंधित शाळांना आपल्या स्तरावरून स्पष्ट सूचना देण्यात याव्यात.

तसेच ऑनलाईन प्राप्त थकीत देयके शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प./अधीक्षक, वेतन पथक (माध्यमिक) सर्व यांनी शासन निकषानुसार पडताळणी करून विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे ऑनलाईन फॉरवर्ड करावे. तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी त्यांचेकडे ऑनलाईन प्राप्त थकीत देयके शासन निकषानुसार तपासून पडताळणी करून पात्र थकीत देयके संचालनालयाकडे ऑनलाईन फॉरवर्ड करण्याची कार्यवाही करावी.

हे ही वाचा

👉शिक्षकांच्या जिल्हा अतर्गत बदली बाबत

👉NMMS परीक्षा ऑनलाईन अर्ज भरणे बाबत

👉सरळसेवेने मानधन तत्वावर पदे भरणे बाबत

👉चित्रकला स्पर्धा एक लाखाचे पारितोषिक

👉मुलींच्या शिष्यवृत्तीत तिपटीने वाढ

👉परिवहन समिती शासन निर्णय

👉अंगणवाडीसेविका व मदतनीस यांच्या मानधनात भरघोस वाढ

👉शाळा आता पाच तासच भरणार

प्रत श्री. पवन जोशी, प्रोजेक्ट लिड, शालार्थ सिस्टीम, महाआयटी, मुंबई यांना उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की,

शालार्थ प्रणालीमध्ये थकीत देयके ऑनलाईन सादर करण्याचा टॅब/सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावा. व सदरची

प्रणाली सुरळीतपणे सुरू राहील याची दक्षता घ्यावी. तसेच तांत्रिक अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी.