मुल्यांकन बाकी असलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची माहिती सादर करणेबाबत shala mulyankan mahiti 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुल्यांकन बाकी असलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची माहिती सादर करणेबाबत shala mulyankan mahiti 

राज्यातील अनुदानित बंद पडलेल्या शाळा तसेच अद्याप मुल्यांकन बाकी असलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची माहिती सादर करणेबाबत.

संदर्भः- १) शासन पत्र क्रमांकः संकीर्ण-२०२४/प्र.क्र.४०/एसएम-४. दि.२८.०३.२०२५

२) शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांचे पत्र क्र. शिसंमा-२०२५/ (एस-७)/ शाळांची यादी/१६३८,दि.२९.०३.२०२५

वरील संदर्भिय पत्र व त्यासोबतचे सह पत्र सुलभ संदर्भासाठी सोबत जोडली आहे. संदर्भीय पत्रान्वये खालील एकत्रित माहिती दिनांक २ एप्रिल, २०२५ पूर्वी सादर करणेबाबत शासनाचे निर्देश आहेत.

त्या अनुषंगाने आपल्या जिल्हयाची खालील मुद्यांची माहिती दिनांक ०१.०४.२०२५ पूर्वी या कार्यालयास सादर करावी.

१. महाराष्ट्रातील इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या (माध्यमिक शाळा) १०० टक्के अनुदानित बंद पडलेल्या शाळांची यादी.

२. महाराष्ट्रातील इयत्ता ११ वी ते १२ वी पर्यंतच्या कला, विज्ञान व वाणिज्य शाखेच्या १०० टक्के अनुदानित बंद पडलेल्या ज्युनिअर कॉलेजची यादी.

३. महाराष्ट्रातील इयत्ता पाचवी ते दहावी (माध्यमिक शाळा) पर्यतच्या मान्यता प्राप्त माध्यमिक शाळांपैकी मुल्यांकन

बाकी असलेल्या माध्यमिक शाळांची यादी.

४. महाराष्ट्रातील इयत्ता ११ वी ते १२ वी पर्यतच्या मान्यता प्राप्त कला, विज्ञान व वाणिज्य शाखेच्या ज्युनिअर कॉलेजपैकी मुल्यांकन वाकी असलेल्या ज्युनिअर कॉलेजची यादी,

सवय वरील प्रमाणे उपरोक्त शाळांची जिल्हानिहाय एकत्रित माहिती यादीसह दिनांक ०१.०४.२०२५ पूर्वी सोबतच्या प्रपत्रात

या कार्यालयास तसेच संचालनालयास सादर करण्याची दक्षता घ्यावी,

Join Now